Viral Video : विमान प्रवास हा प्रत्येकासाठी खास असतो. मुळात तुम्ही कितीही वेळा विमानानं प्रवास करा, प्रत्येक वेळी पहिल्या प्रवासावेळी जितकी उत्सुकता असते अगदी तितकीच उत्सुकता तुमच्या मनात घर करून असते ही बाबही नाकारता येणार नाही. बरं, विमान प्रवास करायचा म्हटलं की प्रत्येकवेळी आपल्याला खिडकीजवळचीच सीट हवी, अशीच प्रत्येकाची इच्छा असते. काहींना ही संधी सहजपणे मिळते, तर काहींना मात्र त्यासाठी वाट पाहावी लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला विमानाप्रवासात खिडकीजवळची सीट मिळते तेव्हा तुम्ही काय करता? प्रवास सुरु झाल्या क्षणापासून तो संपेपर्यंत तुम्ही बाहेरच पाहत असता, हो ना? असंह एक प्रवासीही करत होता आणि तितक्यातच त्याला असं काहीतरी दिसलं जे पाहून तो भारावला. काय बोलावं हेच त्याला सुचेना. त्यानं जे काही पाहिलं ते दृश्य सहसा इतक्या थेट पाहता येत नाही. म्हणूनच तो क्षण अतिशय खास होता. कारण, त्यानं एक रॉकेट लाँच Live पाहिलं होतं. 


गोष्ट एका अविश्वसनीय व्हिडीओची... 


chefpinkpr या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विमानातून चित्रीत करण्यात आलेला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. जिथं त्यानं विस्तीर्ण आकाशातून एक असा क्षण टीपला जो सहजपणे आपण पाहत नाही. 


व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार विमानातील प्रवाशानं स्पेस सेंटर चित्रीत केलं. त्यानंतर काही क्षणांतच तिथून एक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. व्हिडीओवर लिहिलेलं कॅप्शनही भन्नाट होतं. 'जेव्हा तुम्ही विमानात असता आणि योगायोगानं रॉकेट लाँच पाहायला मिळतं...', हेच ते कॅप्शन. 


हेसुद्धा पाहा : भिर्रssss; बैलगाडा शर्यत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा मराठमोळा युट्यूबर


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Chef Pinkpr (@chefpinkpr)


फेब्रुवारी महिन्यात शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ त्या क्षणापासून सातत्यानं सर्वांच्या फीडमध्ये येत गेला आणि पाहता पाहता तो प्रचंड व्हायरल झाला. त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. मुळात हा व्हिडीओच लाखात एक आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं?


तुम्ही असा कोणता क्षण पाहिलाय का? 


प्रवास करत असताना असाच लाखात एक क्षण आपल्याला पाहायला मिळतो आणि मग त्यावर नेमकी काय प्रतिक्रीया द्यायची हेच आपल्याला कळत नाही. तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? जर तुम्ही असा एखादा क्षण अनुभवला असेल, तर कमेंटमध्ये त्याबद्दल नक्की सांगा.