ट्रम्प यांच्या `या` नीतिमुळे कोरोनाचं वॅक्सीन शोधण्यास येतात अडथळे?
जागतिक साथीचा रोग असलेला कोरोना व्हायरस वॅक्सीनशिवायच नष्ट होणार
मुंबई : अमेरिका सरकारने कोरोना व्हायरसवरील वॅक्सीन शोधण्यास वैश्विक युतीचा हिस्सा न होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अमेरिका स्वतः वॅक्सीन शोधत आहे. theguardian.com च्या रिपोर्टनुसार, ट्रम्प सरकारने 'अमेरिका फस्ट' असा दावा केला आहे. यामुळे विश्वात कोरोनाशी लढण्यासाठी वॅक्सिन तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
ब्रिटन, चीन, कनाडा, तुर्की, सऊदी अरब, जपानसह अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटना, गेट्स फाऊंडेशन आणि युरोपिअन कमिशनसोबत एकत्र येऊन वॅक्सीनवर काम करण्यासाठी वर्चुअल ग्लोबल समिटचं आयोजन केलं होतं. मात्र अमेरिकेकडून कुणीही यामध्ये सहभागी झालं नाही. या समेट दरम्यान वॅक्सीनकरता ८ बिलियन डॉलर फंड जमा करण्यात आला.
तसेच गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, जागतिक साथीचा रोग असलेला कोरोना व्हायरस वॅक्सीनशिवायच नष्ट होणार आहे. ट्रम्प असे म्हणाले की,'अपेक्षा हीच आहे की, एका काळानंतर कोरोना निघून जाईल. आपल्याला पुन्हा याचा सामना करावा लागणार नाही.'
कोरोनाशी लढण्यासाठी वॅक्सीनची गरज नाही ट्रम्पच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेतील अधिकाऱ्यांना चेतावणी द्यावी लागली. अत्याधुनिक लॅब असूनही अमेरिकेतील नागरिकांकरता वॅक्सीन तयार करण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
शास्त्रज्ञांच असं म्हणणं आहे की, जगभरात असंख्य वॅक्सीन कोरोनाविरोधात काही काळात निर्माण होतील. यामध्ये अमेरिकेतील काही तज्ज्ञ लवकरात लवकर वॅक्सीन तयार करण्याची क्षमता ठेवतात. मात्र अमेरिका सरकारने जागतिक युतीमध्ये सहभाग न घेतल्यामुळे हे संशोधन मागे पडत आहे.
अमेरिका आपल्या स्वतःच्या हिमतीवर वॅक्सीन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अमेरिकेतील कंपन्या देखील वॅक्सीनचं उत्पादन तयार करण्याच्या तयारीत आहे. मात्र theguardian.com च्या माहितीनुसार, ट्रम्प अनेक वर्षांपासून वॅक्सीनेशन शोधत असल्याचा खोटा दावा करत आहेत. जेव्हा संपूर्ण देश वॅक्सीन शोधण्यास एकत्र आले तेव्हा टॅम्प जावई जरेद कुशनर आणि इतर लोकांसोबत वॅक्सीन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका सरकारने याला 'ऑपरेशन वार्प स्पीड' असं नाव दिलं आहे.
सेंटर फॉर स्ट्रॅटजिक अॅण्ड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये ग्लोबल हेल्थ प्रोग्रामचे स्टीफन मॉरिसन सांगतात की,'अमेरिकेने संकेत दिले आहेत की ते ४ जून रोजी होणाऱ्या समेटमध्ये सहभागी होणार नाहीत. त्यांनी अमेरिका फर्स्टचा मार्ग शोधला आहे.' यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांवर अडथळा निर्माण होणार आहे. यामुळे ताण वाढू शकतो आणि असुरक्षा देखील निर्माण होऊ शकते.