वॉशिंग्टन :  H-1B visa News : अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (US President Joe Biden) यांनी परदेशी व्यावसायिक व्हिसावरील बंदी उठवली आहे. विशेषत: एच -1 बी व्हिसा (H-1B visa)यात समावेश आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसावर बंदी घातली होती. त्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेची वेळ संपली आहे. अमेरिकन सरकारच्या या निर्णयाचा फायदा हजारो भारतीय आयटी व्यावसायिकांना होईल, अशी अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्कालीन ट्रम्प सरकारने (Donald Trump) अमेरिकेत अर्जदारांच्या अनेक तात्पुरत्या किंवा परप्रवासी नसलेल्या व्हिसा प्रवर्गांच्या प्रवेशावर बंदी घातली होती, त्यामध्ये कोविड -19 (Covid-19 Pandemic)आणि देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) यांच्यात एच -1 बी समावेश होता. ट्रम्प यांनी युक्तिवाद केला होता की आर्थिक परिस्थिती बघता अमेरिकन कामगार आणि बाजारासाठी ते धोकादायक होते.


 H-1B visaबाबत नंतर त्यांनी ही अधिसूचना 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली होती. दरम्यान, जो बियाडेन( Joe Biden)यांनी एच -1 बी व्हिसावरील बंदी सुरु ठेवण्याबाबत नवीन घोषणा जारी केलेली नाही. बायडेन यांनी ट्रम्प यांची धोरणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यांनी एच -1 बी व्हिसावरील निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले  होते.


एच -1 बी व्हिसा हा एक परदेशातून कायमचे वास्तव करण्यासाठी येणारा किंवा आलेला कामगारांसाठी व्हिसा आहे.  (non immigrant worker visas)जो अमेरिकन कंपन्यांना विशिष्ट व्यवसायांसाठी परदेशी व्यावसायिक घेऊ शकतात. आयटी कंपन्या या व्हिसावर भारत आणि चीन सारख्या देशातून दरवर्षी येणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात.