7 Lionesses Attack A Buffalo: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लोकांचा उडालेला गोंधळ तर कधी सीसीटीव्हीमधील फुटेज. अनेकदा जंगलामधील रंजक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अर्थात यापैकी काही जुने व्हिडीओ अचानक ट्रेण्डमध्ये येतात आणि व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आङे. या व्हिडीओमध्ये एका म्हशीवर 7 सिंह हल्ला करताना दिसत आहेत. मात्र या व्हिडीओचा शेवट हा फारच रंजक आहे. 


7 सिंह विरुद्ध 1 म्हैस...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंहांचा झुंड जेव्हा हल्ला करतो तेव्हा सामान्यपणे ते शिकार करतात. सिंहांच्या हल्ल्यातून शिकार सुटणं तसं फारच कठीण. असाच एक हल्ला 7 सिंहांच्या गटाने एका म्हशीवर केला. या म्हशीच्या सर्व बाजूंनी सिंह उभे असून 2 सिंह तिच्यावर तुटून पडल्याचं दिसत आहे. ही म्हैसही हार न मानता या 7 सिंहांना एकटीच झुंज देताना दिसतेय. म्हशीचा आकार हा सिंहाच्या आकारापेक्षा मोठा असल्याने या 7 सिंहांपैकी काही सिंह म्हशीवर पाठीमागू हल्ला करतात. तर एक सिंह या म्हशीचं लक्ष वेधण्यासाठी तिच्यावर समोरुन हल्ला करतो. दरम्यान एक सिंह या म्हशीच्या पाठीवर चढून तिचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो. 


...अन् अचानक असं काही घडलं की


दरम्यान, ही म्हैसही पराभव स्वीकारण्यास तयार नसल्याचं दिसतं. ही म्हैस शिंगाने समोरच्या सिंहाला अगदी उडवून लावते. समोरचा सिंह काही फुटांपर्यंत उडी मारत म्हशीच्या हल्ल्यापासून आपला जीव वाचवतो. मात्र या म्हशीला अडचणीत पाहून तिच्या कळपातील अन्य एक म्हैस थेट तिला वाचवण्यासाठी सिंहांच्या या गटावर चाल करुन येते. ही मदतीला आलेली म्हैस शिंगाने थेट एका सिंहाला पळवून लावते. मदतीला सहकारी आल्याचं पाहून हल्ला झालेली म्हैसही अगदी जोरात स्वत:चं शरीर झटकून आजूबाजूच्या सिंहांना आपल्यापासून दूर करते. आधीच एका म्हशीवर नियंत्रण मिळवता येत नसताना दुसरी म्हैस तिच्या मदतीला आल्याचं पाहून सिंहांचा हा गट काढता पाय घेतो.


सोशल मीडियावरही हा व्हिडीओ शेअर करताना, "घाबरु नका जेव्हा तुमच्यासोबत तुमचा मित्र असेल," अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला 1.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ रोअरिंग अर्थ या चॅनेलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. 



एका अभयारण्यामधील हा व्हिडीओ पर्यटकांच्या जीपमधून शूट करण्यात आलेला आहे.