मुंबई : कधी कुणाला काय होईल, याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. आरोग्याबाबतीत (Health) गेल्या काही वर्षात अनेक समस्या समोर आल्या आहेत. हार्ट अटॅक (Heart Attack), उच्च रक्तदाब (High Blood Pressre) या आणि यासारख्या अनेक आजारांनी डोकं वर काढलंय. मात्र इ-गॅजेट्समुळे हल्ली आपल्या हृद्याचे ठोके या आणि यासारख्या अनेक बाबी समजतात. डिजीटल वॉच आपल्या शरीराच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतं. याच डिजीटल वॉचमुळे एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचलाय. Apple Watch मुळे 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवनदान मिळालं.  चक्क या वॉचमुळे त्या मुलीला कॅन्सर असल्याचं निदान झालं. ज्यामुळे वेळीच उपचार करता आले. (apple watch saved girl life who detected cancer) 


हार्ट रेटमुळे समजलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हावर डेट्रॉईट (Hour Detrout) या नियतकालिकेनुसार, Apple Watch या मुलीला एबनॉर्मल हार्ट रेट असल्याचं अलर्ट मिळत होता. याआधी असं काही झालं नव्हतं. त्यामुळे या मुलीच्या आईला थोडं वेगळं असल्याचं जाणवलं.


सातत्याने अलर्ट मिळत होता.  तेव्हा या मुलीच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर मुलीला रुग्णालयात जायचं ठरवलं. मात्र त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं. मुलीची तपासणी केल्यानंतर तिला अपेंडिक्समध्ये न्यूरोइंडोक्राइन ट्यूमर असल्याचं निदान झालं. लहान मुलांमध्ये हा आजार फार रेअरली आढळतो. हा ट्यूमर मुलीच्या शरीरातील दुसऱ्या भागातही पसरलं. यानंतर डॉक्टरांनी वेळ न दवडता शस्त्रक्रिया करुन ट्यूमर काढला. सर्जरीनंतर मुलीला स्वस्थ वाटू लागलं.


अनेकदा आजाराचं उशिराने निदान होतं. तो पर्यंत वेळ निघालेली असते. मात्र एप्पल वॉचने वेळीच अलर्ट दिला. तसेच आईच्या सतर्कतने या मुलीचे प्राण वाचले. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागली नसती. मात्र या सर्व प्रकारातून ही चिमुरडी सुखरुप बाहेर पडली. या चिमुरडीसाठी काळ आला होता पण 'वेळ' आली नव्हती, हे वाक्य अगदी परफेक्ट लागू होतं.