पाकिस्तानात ५ स्टार हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला
पाकिस्तानातल्या ग्वादरमध्ये एका ५ स्टार हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील ग्वादरमध्ये एका ५ स्टार हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या ठिकाणी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक सुरू आहे, अशी माहिती एएनआयने पाकिस्तान मीडियाच्या हवालानुसार दिली आहे. पाकिस्तानातील ग्वादर या ठिकाणी असलेल्या पर्ल काँटीनेंटल हॉटेलवर हा हल्ला करण्यात आला आहे. ग्वादर हे बलोचिस्तानात आहे.
या ५ स्टार हॉटेलमधल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा हॉटेलमध्ये किती लोक होते, याची माहिती मिळालेली नाही. दहशवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आहे, असे पाकिस्तानी मीडियानी दिलेल्या वृत्तानुसार सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या आधी अतिरेकी हल्ला झाला होता. हा हल्ला ग्वादरमध्येच झाला होता. एका दहशतवादी हल्ल्यात नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या जवानांसह १४ जण मारले गेले होते. दोन आठवड्यांपूर्वीच हा हल्ला झाला होता. पुन्हा हल्ला झाल्याने येथील नागरिक भितीच्या छायेखाली आहेत.