नवी दिल्ली : इराणमध्ये एका पुरुष कोचला महिला विभागात जाताना हिजाब घालायची वेळ आलीयं.


आशियाई कबड्डी चॅँम्पियनशीप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इराणमध्ये झालेल्या आशियाई कबड्डी चॅँम्पियनशीपमध्ये एका पुरूष कोचला हिजाब घालावा लागला आहे. त्याची छायाचित्र सोशल मिडियामध्ये वायरल झाली आहेत.


इराणी महिलांची कुचंबणा


अलीकडेच दोरसा देराखशानी हिने १९ वर्षीय इराणी बुद्धिबळपटू सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. हिजाब घालण्यास नकार दिल्यामुळं तिला मायदेशाकडून खेळण्यास मनाई करण्यात आली होती. 


थायलंडचे महिला कबड्डी कोच आणि हिजाब


इराणमध्ये सांस्कृतिक, धार्मिक नियम फार कडक आहेत. त्याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे थायलंडच्या महिला कबड्डी कोचला झालेली हिजाब घालण्याची सक्ती. अलिकडेच आशियाई कबड्डी चॅँम्पियनशीप २०१७ इराणच्या गॉर्गन इथं पार पडल्या. या स्पर्धेदरम्यान थायलंडचे महिला कबड्डी कोच हिजाब घालुन सामन्याला हजर राहिल्याची छायाचित्रं सोशल मिडियामध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यावरून खूप खळबळही उडालीयं.