China Tiangong Space Station:  अमेरिकेची अंतराळ संस्था अर्थता NASA  चे अंतराळवीर फ्रॅंक रुबिओने (Frank Rubio) 371 दिवस अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले आहेत. तब्बल 371 दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन (International Space Station)  राहून फ्रॅंक रुबिओ यांनी नवा विक्रम रचला आहे. नासाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर घडणाऱ्या सर्व घडामोडींचे अपडेट सोशल मिडियावर शेअर केले जातात. अशातच आता चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी अंचबित करणारा प्रयोग केला आहे. या प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि उघड्या ज्वालांबाबत कडक नियम असताना चीनने हा प्रयोग केला आहे. 


स्पेस स्टेशनवर मेणबत्ती पेटवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनने आपले स्वत:चे स्पेस स्टेशन आहे. ‘तियांगॉन्ग’ असे या स्पेस स्टेशनचे (Tiangong space station China) नाव आहे.  चीनच्या शेनझोऊ 16 अंतराळवीरांनी तियांगॉन्ग  स्पेस स्टेशनमध्ये मेणबत्ती पेटवली आहे. एका प्रयोगाचा भाग म्हणून ही मेणबत्ती पेटवण्यात आली होती. या प्रयोगाचे लाईव्ह टेलिकास्ट देखील करण्यात आले होते. 21 सप्टेंबर रोजी चीनच्या तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवरून थेट प्रक्षेपण करताना अंतराळवीर गुई हाईचाओ आणि झू यांगझोऊ एक मेणबत्ती पेटवली. तियांगॉन्ग स्पेसशनवरुन ऑनलाईन लेक्चर घेतले जाते. याला 'तियांगॉन्ग क्लासरूम' असे म्हंटले जाते. यावेळी एक प्रयोग दाखवताना ही मेणबत्ती पेटवण्यात आली.


मेणबत्ती पेटवल्यावर काय झाले?


स्पेस स्टेशनवर कोणत्याही प्रकारचे वातावरण नसते यामुळे येथे पाणी देखील गोठलेल्या स्वरुपात दिसते. अशातच आगीच्या ज्वाळांचे निरीक्षण करण्यासाठी हा मेणबत्ती पेटवण्याचा प्रयोग करण्यात आला. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये आगीच्या ज्वाळा कशा प्रकारे काम करतात याचे निरीक्षण करणे हे या प्रयोगामागचे मुख्य उद्दीष्ट आहे. पृथ्वीवर मेणबत्ती पेटवल्यास त्यापासून ज्वाळा तयार होतात. मात्र, चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये  पेटवण्यात आलेल्या मेणबत्तीच्या ज्वाळा या पृथ्वीच्या निम्न कक्षाच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात गोल आकारात परावर्तित झाल्याचे  व्हिडिओत दिसत आहे. मेणबत्तीच्या ज्वाळा अजिबात पसरत नसल्याचे दिसत आहे.  



चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी मोडला नियम 


1997 मध्ये  रशियाचे मीर अंतराळ स्थानकात आग लागली होती. यानंतर  इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि उघड्या ज्वालांबाबत कडक नियम करण्यात आले आहेत. असे असताना चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी मेणबत्ती पेटवून प्रयोग केला.     


चीनने आपले स्वत:चे स्पेस स्टेशन 


NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International Space Station)  15 देशांच्या सहकर्याने तयार करण्यात आले आहे. तर,  चीनने आपले स्वत:चे स्पेस स्टेशन  आहे. हे स्पेश स्टेशन उभारण्यासाठी चीनला 3 दशकांचा वेळ लागला. हे अंतराळ स्थानक 180 फूट (55 मीटर) उंच आहे. यात तीन मॉड्यूल्स आहेत जे स्वतंत्रपणे लाँच केल्यानंतर अवकाशात जोडले गेले.