`ऑडी`च्या सॉफ्टवेअर फसवणुकीसाठी सीईओ रुपर्ट स्टॅडलरला अटक
`पुरावे लपवण्यासाठी रुपर्ट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं`
नवी दिल्ली : 'ऑडी' या प्रसिद्ध कार कंपनीचे कार्यकारी अधिकारी रुपर्ट स्टॅडलर यांना पैतृक कंपनी 'फॉक्सवॅगन'च्या डीजलगेट उत्सर्जन घोटाळ्याशी संबंधीत फसवणुकीसाठी अटक करण्यात आलीय. जर्मनीच्या वकिलांनी सोमवारी ही माहिती दिलीय. गेल्या आठवड्यात स्टॅडलर यांच्या घरावर छापेमारी करणाऱ्या म्युनिखच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरावे लपवण्यासाठी रुपर्ट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.
गेल्या वर्षी 'फॉक्सवॅगन' आपल्या डीझेल गाड्यांचं प्रदूषण स्तर लपवण्यासाठी सॉफ्टवेर वापरासाठी दोषी ठरली होती. आता पुन्हा एकदा फसवणुकीचा आरोप याच कंपनीच्या 'ऑडी' गाड्यांवर होतोय. गेल्या महिन्यात ऑडीचे सीईओ रुपर्ट स्टॅडलर यांनी, ऑडी ए ६ आणि ए ७ मॉडलच्या ६०,००० गाड्यांमध्ये प्रदूषण स्तर लपवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केलाय.
२०१५ साली एका अमेरिकन एजन्सीनं फॉक्सवॅगनच्या गाड्यांमध्ये करण्यात आलेली फसवणूक उघड केली होती. कंपनीनंही प्रदूषण चौकशीला चकवण्यासाठी आपण १.१ करोड कारच्या सॉफ्टवेअरमध्ये गडबड केल्याचं मान्य केलं होतं. या प्रकरणी जर्मनी अथॉरिटीजनं फॉक्सवॅगनवर डीझेल एमिशन स्कँडल प्रकरणात १ अरब युरोचा (जवळपास १.१८ अरब डॉलर) दंड लावला होता. त्यानंतर कंपनीनं अधिकृतरित्या माफीही मागितली होती.