फ्रान्सपाठोपाठ ऑस्ट्रियात दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू
नागरिकांना घरीच राहण्याचं केलं आवाहन
व्हिएन्ना : युरोपातील ऑस्ट्रिया देशाची राजधानी असलेल्या व्हिएन्ना शहरात दहशतवादी हल्ला झाला आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी २६/११ प्रमाणे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २ लोकांचा मृत्यू झाला आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेली मेलच्या माहितीनुसार, आतापर्यंत एका दहशतवादाच्या खात्मा झाला असून २ स्थानिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
व्हिएन्ना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजता गोळीबाराची घटना घडली. दहशतवाद्यांनी गोळ्यांचे अनेक राऊंड केले. गोळीबाराची ही घटना शहरातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. या घटनेत अनेक लोकं जखमी झाले. ज्यामध्ये एका ऑफिसरचा देखील समावेश आहे.
व्हिएन्नाच्या पोलिसांनी जनतेला ट्विट करून सावधान राहण्यास सांगितलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन देखील केलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितलं आहे.