मुंबई : कोरोना व्हायरसचा (Corona Virus) कहर आता कुठे कमी होतोय. पण जगात एक नवा व्हायरस धुमाकूळ घालू शकतो असं भाकित केलं गेलंय. कुणी केलंय हे भाकित, कोणता आहे हा व्हायरस पाहुयात एक रिपोर्ट. कोरोनाचा कहर आता कुठे निवळतोय, जग पुन्हा रुळावर येतंय. पण त्यात 2022 मध्ये एक भयानक व्हायरस जगात धुमाकूळ घालेल असं भाकित वर्तवण्यात आलंय. प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगानं (Baba Vanga) हे भाकित वर्तवलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगांनी केलेली अनेक भाकितं आजपर्यंत खरी ठरलीयेत. 2022 सालासाठी बाबा वेंगानं एक भविष्यवाणी केली होती. (baba vanga prediction about new virus for 2022 year) 


बाबा वेंगाचं भाकित काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 मध्ये एक खतरनाक व्हायरस जगात येईल. हा व्हायरस सायबेरियातून निघेल. 2022पर्यंत हा व्हायरस गोठलेला असेल. ज्यानुसार जलवायू परिवर्तनामुळे बर्फ वितळेल आणि व्हायरस पसरेल. जगात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असं भाकित बाबा वेंगानं वर्तवलं होतं. 



2022 साठी बाबा वेंगानं 6 भाकितं वर्तलीयेत. यातली आतापर्यंत दोन खरी ठरलीयेत. बाबा वेंगानं रशिया आणि ऑस्ट्रेलियात पुराचं भाकित वर्तवलं होतं, ते खरं ठरलं. 5079 पर्यंत बाबा वेंगानं भविष्य वर्तवलेली आहेत. बाबा वेंगाचा जन्म बल्गेरियात 1911 मध्ये झाला होता, 12 वर्षांचे असताना त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर त्यांनी भाकितं वर्तवायला सुरुवात केली ज्यापैकी 85% भाकितं खरी ठरलीयेत. 1996 मध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यांनी वर्तवलेली भाकितं त्यानंतरही खरी ठरत राहिली. आता 2022 साठी बाबा वेंगानं एका व्हायरसचं भाकित वर्तवलंय. ते खरं ठरू नये अशीच अपेक्षा.