Baba Vanga Predictions: नवं वर्ष म्हणजे 2024 सुरु व्हायरला आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे.  जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्यांपैकी एक बाबा वेंगा हे मानले जातात. त्यांच्या वर्तवलेल्या भाकितांमध्ये अनेकांना मोठी उत्सुकता आहे. (Baba Vanga 2023 Predictions) याचे कारण त्यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 9/11 चा हल्ला आणि युक्रेन युद्धाचं भाकितही बाब वेंगाने वर्तवलं होतं. आता 2024 साठी त्यांनी 7 भाकितं वर्तवली आहेत. 26 वर्षांपूर्वी वयाच्या 85 व्या वर्षी बाबा वेंगाचं निधन झालं. बाबा वेंगाच्या भविष्याला वैज्ञानिक प्रमाण नसलं तरी अनेकांचा यावर अतुट विश्वास आहे. बाबा वेंगा ही एक दुरदृष्टी असलेली महिला होती असं अनेकांचं मत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता 2024 साठी बाबा वेंगाने जगावर परिणामकारक ठरणारी सात भाकितं वर्तवली आहेत.


1. पुतीन यांची हत्या
बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार 2024 मध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची हत्या होणार आहे, आणि यासाटी एक रशियन नागरिकच जबाबदार असेल. 


2. यूरोपमध्ये दहशतवात
बाबा वेंगा यांनी संपूर्ण युरोपमध्ये दहशतवाद वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.  युरोपातला एक प्रमुख देश जैविक शस्त्रांची चाचणी घेऊ शकतो किंवा येत्या वर्षात मोठे हल्ले करू शकतो.


3. नैसर्गिक आपत्ती
बाबा वेंगा यांनी हवामानविषयक घटनांसह किरणोत्सर्गाच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. यानुसार येत्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 


4. आर्थिक संकट
2024 मध्ये सर्वात मोठं संकट असेल ते म्हणेज आर्थिक समस्या असं बाबा वेंगाने म्हटलं आहे. वाढत कर्ज, वाढता जागतिक तणाव आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे सत्ताबदल यामुळे आर्थिक संकटाचा इशारा दिला आहे. 


5. सायबर हल्ले
2024 मध्ये सायबर हल्ले वाढतील. बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, हॅकर्स पॉवर ग्रीड्स आणि वॉटर ट्रीटमेंट सुविधांसारख्या अतिमहत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका वाढेल.


6. तांत्रिक क्रांती
2024 मध्ये तांत्रिक क्रांती होईल असा अंदाजही बाबा वेंगाने वर्तवला आहे. बाबा वेंगा यांनी क्वांटम कंप्युटिंगमध्ये महत्त्वपूर्ण झेप घेण्याची अपेक्षा केली आहे, 


7. वैद्यकीय शोध
कॅन्सर आणि अल्झायमर या दोन्ही गंभीर आजारांवर उपचारांचा शोध लागल्याचे भाकीत वर्तवलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठे शोध लागतील ज्यामुळे सामान्यांना आशेचा किरण मिळेल असंही बाबा वेंगाने म्हटलंय.