बाबा वेंगाने 2024 वर्षासाठी केलेल्या तिन्हीच्या तिन्ही भविष्यवाणी खऱ्या ठरल्या; जे भाकीत केलं तेच घडलं
2024 मध्ये बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली आहे. जाणून घेऊया बाबा वेंगाने 2024 वर्षासाठी काय भाकित केले होते.
Baba Vanga Predictions 2024 : 2024 हे वर्ष संपण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. नविन वर्षाचं प्लानिंग करताना जुन्या वर्षाच्या घडामोडींचा आढावा घेतला जातो. अशातच चर्चेत आली आहे ती प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगा (Baba Vanga Predictions) याने 2024 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी. बाबा वेंगाने 2024 वर्षासाठी केलेल्या तिन्हीच्या तिन्ही भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगाने जे भाकीत केलं होत तेचं घडलं आहे.
2024 या वर्षासाठी बाबा वेंगाने भयानक भविष्यवाणी केली होती. 2024 या वर्षात जागतिक आर्थिक संकट येईल. हवामानात बदल पहायला मिळेल आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असे भाकित बाबा वेंगाने केले होते. बाबा वेंगाने 2024 वर्षासाठी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.
हे देखील वाचा... पृथ्वीच्या पोटात सापडला सर्वात पावरफुल खजिना! पुढच्या 200 वर्षांची चिंता मिटली
2024 मध्ये जागतिक आर्थिक संकट येईल असे भाकीत बाबा वेंगाने केले होते. राजकीय तणाव, बदलत्या आर्थिक शक्ती आणि वाढत्या कर्जाचा बोजा यामुळे जगात आर्थिक संटक निर्माण होईल असे बाबा वेंगाचे भाकित होते. हे भाकित खरे ठरल्याचे दिसत आहे. अमेरिकेत मंदीची लाट आली आहे. उच्च महागाई, टाळेबंदी, तसेच व्याजदर वाढतील असा शक्यता अनेक अर्थतज्ञांनी वर्तवल्या आहेत.
हे देखील वाचा... बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्यात; जे सांगितलं तसंच घडलं
2024 मध्ये हवामान संकट येणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंगाने केली होती. हे भाकीतही खरे ठरल्याचे दिसत आहे. 2024 मध्ये जागतिक तापमानाचा विक्रम मोडला आहे. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या उपसंचालक समंथा बर्गेस यांनी पुष्टी केली आहे. 2024 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.
हे देखील वाचा... भारतात रक्त गोठवणारी थंडी! लडाखमध्ये मायनस 24 डिग्री तापमान, काश्मिरमध्ये 'चिल्लई कलान'
वैद्यकीय क्षेत्राबाबत बाबा वेंगाने केलेली सकारात्मक भविष्यवाणी 2024 मध्ये खरी ठरली आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या उपचारात मोठे यश मिळाले आहे. इंटरलेस चाचणीच्या निकालांत महत्वाचे संशोधन झाले आहे. जर रुग्णांना सामान्य उपचार सुरू करण्यापूर्वी केमोथेरपीचा एक छोटा कोर्स दिला, तर मृत्यूचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो असे इंटरलेस चाचणी आढळून आले आहे.