Mother Burned Her Infant In An Oven: आई आपल्या बाळाला जीवापाड जपते. बाळाला कुठे दुखत-खुपत असेल तर सगळ्यात पहिले आईलाच कळते. मात्र, एका आईने चक्क आपल्या पोटच्या बाळाला ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाच्या शरीरावर भाजल्याचे चट्टेही सापडले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आईवर कारवाई केली आहे. अमेरिकेतू ही धक्कादायक बातमी समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील मिजूरी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात बाळाला झोपवण्यासाठी त्याच्या आईने पाळण्याऐवजी त्याला चुकून सुरू असलेल्या ओव्हनमध्ये ठेवले. ज्या ओवनचा वापर जेवण बनवण्यासाठी आणि गरम करण्यासाठी केला जातो. त्यामध्येच आईने तिच्या लेकराला ठेवले. ओव्हनमध्ये ठेवल्यानेएक महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंसास सिटी येथे राहणाऱ्या मारियाह थॉमस असं या महिलेचे नाव आहे. मुलाचा जीव धोक्यात टाकण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केले आहे. शुक्रवारी दुपारी पोलिसांना एक फोन आला. त्यांना सांगण्यात आले की, एका नवजात मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांनी पाहिले की नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना त्याच्या शरीरावर भाजल्याचे चट्टेही उठले होते. त्यानंतर पोलिसांनी नवजात मुलाला मृत घोषित केले. 


या प्रकरणाची सूचना मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांना महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आईने बाळाला झोपवण्यासाठी पाळण्याऐवजी चुकून ओव्हनमध्ये ठेवले. मात्र, ही चुक कशी घडली हे मात्र तिने चौकशीत सांगितले नाही. 


जॅक्सन काउंटीमध्ये अभियोजना पक्षाचे वकील जीन पीटर्स बेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खूप दुखःद घटना आहे आणि एका नवजात मुलाचा मृत्येमुळं आम्हाला दुखः आहे. आम्हाला विश्वास आहे की न्यायदेवता या भयानक घटनेसंदर्भात योग्य ती कारवाई करेल. 


दरम्यान, बाळाच्या मृत्यूवर निरनिराळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. आईने जाणीवपूर्वक बाळाला ओव्हनमध्ये ठेवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर, आईची मानसिक अवस्था ठिक नसल्याचाही तर्क लढवला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. तर, पुढील तपास सुरू आहे. त्यामुळं नक्की बाळाचा मृत्यू कसा झाला व बाळाची आई खरं बोलत आहे का? हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.