वॉशिंग्टन : आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीला अमेरिकेच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी ठार मारले. या कारवाईचा व्हिडिओ अमेरिकेकडून बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. सीरियातल्या इदलिब भागात ही कारवाई झाली. ज्याठिकाणी बगदादी लपला होता. दरम्यान, या अतिरेक्याला मारण्यासाठी श्वानाने महत्वाची भूमिका निभावली आहे. त्याला 'अमेरिकेचा हिरो' असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधले आहे. तसेच त्याला मेडल बहाल करत असल्याचे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अबू बक्र अल बगदादीला शोधण्यात आणि त्याचा खात्मा करण्यात महत्वाची भूमिका बजावली ती, एका श्वानानं, त्याचा फोटो काल डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशलमिडयावर शेअर केला होता. बेल्जियम मेलोनिस या बेल्जियम सेफ्फोर्ड या जातीच्या कुत्र्यानं बगदादीला शोधण्यात अमेरिकेच्या डेल्टा फोर्सला मदत केली होती. 



या जातीचे पाच कुत्रे दिल्ली पोलीसांच्याही डॉग स्क्वॉडमध्ये आहेत. एकूण १४ श्वान दाखल होणार आहेत. त्यांच्या प्रशिक्षकाने सांगितले की, हा कुत्रा डाबर मेन, लेब्रा, जर्मन शेफफोर्डपेक्षा खूप वेगवान आहे. बेल्जियम जातीच्या या कुत्र्याची धावण्याची आणि वास घेण्याची क्षमता इतर कुत्र्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळेच, त्यांना विशिष्ठ दर्जा आहे. 




दरम्यान, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) चा म्होरक्या दहशतवादी सरगना अबू बक्र अल बगदादी मारला गेल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यानंतर जगभरातील देशांनी यावर प्रतिक्रिया दिली. मात्र, पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रेहमान मलिक यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बगदादी मारल्या गेल्याची खातरजमा आयएसआयने केली नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता अमेरिकेने व्हिडिओ जारी केल्याने पाकिस्तानला मोठी चपराक मिळाली आहे. 


२७ ऑक्टोबरला आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीवर सीरियात अमेरिकेने हल्ले चढवले. यामध्ये अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसनी उत्तर सीरियात हल्ला चढवल्याची माहिती तीन बड्या अधिकाऱ्यांनी दिली. यातचअबू बक्र अल बगदादीचा खात्मा झाल्याचे सांगण्यात आले होते. तसे अमेरिकेकडून जाहीरही करण्यात आले होते.