बिजिंग : जगभरातल्या बच्चे कंपनीचं आकर्षण असणारं विनी द पूह हे कार्टून कॅरेक्टर चीनमध्ये वादात सापडलं आहे. ब्रिटीश लेखक ए ए मिल्न यांच्या कल्पनेतून हे अस्वल कार्टून साकारलं आहे. या कार्टूनवर सध्या चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनचे पंतप्रधान क्षी जिनपिंग यांचं प्रतिक म्हणून गेल्या काही दिवसांपासून या अस्वलाचा वापर चीनमध्ये होतो आहे. जिनपिंग यांच्यावर थेट टीका करण्याचं स्वातंत्र्य चीनी माध्यमांमध्ये नसल्यामुळं विनी द पूहचं प्रतिक वापरून त्यांच्यावर टीका केली जाते. जिनपिंग आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांची भेट असो किंवा जिनपिंग आणि बराक ओबामांची भेट असो. प्रत्येक वेळी विनीचं कॅरेक्टर वापरून राजकीय भाष्य केलं जातंय. त्यामुळं यापुढे चीनमध्ये कुठल्याही माध्यमातून हे कार्टून अस्वल दिसणार नाही, याची खबरदारी सध्या सरकारी यंत्रणा घेते आहे. विनी द पूह नावानं चीनमध्ये काहीही सर्च केलं, तरी ते कंटेंट बेकायदेशीर असल्याचा मेसेज इंटरनेटवर येतो. चिनी मेसेजिंग ऍप असणा-या 'वुई चॅट'वरूनदेखील विनीची स्टिकर्स काढून टाकण्यात आली आहेत.