अध्यक्ष असताना माझ्यामुळे ट्रॅफिक जाम होत होता...पण आता
या मुलाखतीत ओबामा यांनी राष्ट्रपती पद सोडल्यानंतर, आपल्या जीवनात नेमके काय बदल झाले, याविषयी सांगितलं.
लंडन : ब्रिटनचे प्रिन्स हॅरी यांनी बीबीसी रेडिओसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ओबामा यांनी राष्ट्रपती पद सोडल्यानंतर, आपल्या जीवनात नेमके काय बदल झाले, याविषयी सांगितलं.
माझ्यामुळे ट्रॅफिक जाम होत होती, आता...
बराक ओबामा यांच्यावर बोलताना म्हणाले, जेव्हा मी राष्ट्रपती होतो, तेव्हा माझ्यामुळे ट्रॅफिक जाम होत होती, आता मी स्वत: ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो.
प्रत्येक निर्णयाला मला मिशेलची साथ
बराक यांनी त्यांची पत्नी मिशेल विषयी बोलताना सांगितलं, मिशेल ही राजकारण करणारी व्यक्ती नव्हती, तरी पण मिशेलने फर्स्ट लेडी म्हणून चांगलं काम केलं आहे.
माझ्या प्रत्येक निर्णयाला मला मिशेलने साथ दिली. लग्नाच्या एवढ्या वर्षानंतरही, आम्ही खूप चांगले मित्र आहोत, आमच्या मुलीही आता मोठ्या होत आहेत.
इंटरनेटमुळे विचार करण्याची क्षमता घटली
इंटरनेटमुळे विचार करण्याची क्षमता कमी झाली आहे, लोक वेगळ्याच जगात जगत आहेत, समाजासाठी हा मोठा धोका आहे. लोकांची विचार करण्याची क्षमता यामुळे कमी होत आहे, तुमच्यासमोर असलेल्या काल्पनिक विचारांनी तुम्ही बांधले जातात.
लीडर्सने जरा काही वेगळा विचार करावा
आपली जागा बनवण्यासाठी लीडर्सना इंटरनेटपासून बाजूला जाऊन वेगळा रस्ता निवडावा लागेल. कारण इंटरनेट आणि सोशल मीडियावर आपण फक्त माहिती किंवा बातम्या वाचतो. मात्र दुसरी बाजू लोक सोशल मीडियावर समजून घेण्यास कमी पडतात, किंवा अशी माहिती कमी येते.