`या` शर्यतीमध्ये बराक ओबामांनी केली डोनाल्ड ट्रम्पवर मात
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव आहे. पण बराक ओबामा यांच्यासाठी हे वर्ष खास ठरलं आहे.
अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव आहे. पण बराक ओबामा यांच्यासाठी हे वर्ष खास ठरलं आहे.
बराक ओबामांच्या ट्विटसने डोनाल्ड ट्रम्पवर मात केली आहे.
बराक ओबामांची कमाल
यंदा ट्विट करण्यात आलेल्या लोकप्रिय 10 ट्विट्समध्ये बराक ओमाबांच्या ट्विटचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या ट्विटला सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळाली आहे. व्हर्जिनियातील शर्लोट्सविले मध्ये भडकलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी ट्विट केले आहे.
काय होते ट्विट ?
बराक ओबामांनी नेल्सन मंडेला यांच्या 1994 साली प्रकाशित झालेल्या आत्मकथेच्या उदाहरणाचा ट्विट
करताना लिहले होते ' कोणतीही व्यक्ती दुसर्या व्यक्तीच्या शरीराचा रंग, त्याची पार्श्वभूमी, धर्म यांच्या आधारे त्याच्याबद्दल द्वेषभावना घेऊन या जगात येत नाही.
ट्विटरने केला गौरव
ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा सर्वाधिक वापर केला आहे. मात्र तरीसुद्धा त्यांचे कोणतेच ट्विट टॉप लिस्टमध्ये नाही. ओबामांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्विट्ला सर्वाधिक लाईक्स मिळाले होते. सुमारे 4 करोड 60 लाख लोकांनी लाईक केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑफिशिएल ट्विटर अकाऊंटचा वापर करून सर्वाधिक ट्विट्स केले आहेत.