बिजींग : युद्धासाठी चीनच्या लष्करानं तयार रहावं असे आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला ९० वर्ष पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमादरम्यान चीनच्या लष्कराशी बोलताना शी जिनपिंग यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच सैन्यानं नेहमी युद्धाला तयार राहावं. चीनी सैन्य शत्रूंच्या पराभवासाठी सक्षम आहे. असं जिनपिंग म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि चीनमध्ये गेल्या महिन्याभरापासून सिक्कीमच्या डोकलामवरून मोठा वाद सुरू आहे. डोकलामच्या मुद्द्यावरून सीमेवरही तणाव निर्माण झाला आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीनला गेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी जिनपिंग यांची भेट घेऊन डोकलामचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यात यश आलं नाही.