मुंबई : चिरतरुण सौंदर्याची व्याख्या सांगणारे अनेक चेहरे कायमच आपल्या समोर येतात. काही महिला स्वत:च्या सौंदर्याबाबत बऱ्याच सजग असतात. इतक्या, की त्यांच्या खऱ्या वयाचा अंदाज लावणंही कठीण होऊन बसतं. अशाच एका महिलेनं तिच्या सौंदर्यानं, रुपानं सर्वांच्याच तर्काला चकवा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधील या महिलेचं नाव आहे, लिजा लॉरे. तिला पाहून वयाचा आकडा नेमका किती याचाच विसर पडतो. ही 30 वर्षांच्या आसपास वय असणारी महिला असावी, असाच अनेकांचा समज. पण, मुळात तिचं वय याहून जास्त आहे हे कळताच सर्वांना धक्का बसतो. 


लिजाचं मूळ वय आहे, 52 वर्षे. कोणत्याही अँटी रिंकल ट्रीटमेंटचा वापर न करता आणि वारंवार त्वचेची काळजीही न घेता आहे हे असं रुप आहे, हेच कायम लिसा सांगते. अनेकदा काही तरुण माझ्याशी फ्लर्ट करतात, असं लिजा सांगते. तारुण्यावस्थेतही सौंदर्यावरुन अशा प्रतिक्रिय़ा कोणी दिल्या नव्हत्या ज्या आता ऐकून फार छान वाटतं असंच लिजा सांगते. 



लिजा मेकअपचा वापर तर करते, पण त्याचं प्रमाण फार कमी असतं. नैसर्गिकरित्याच ती त्वचेची काळजी घेते. जसंकी कापलेला बटाटा ती ओठांवर लावते. ओठांसाठी हे फार फायद्याचं ठरतं असं लिजा सांगते. काय मग, तुम्हाला कसं वाटलं लिजाचं हे रुप?