वॉशिंग्टन : अमेरिकेची ब्यूटी क्वीन आणि मिस केंटकीचा खिताब जिंकणाऱ्या रॅमसे बियर्सवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल आहे. बियर्सविरुद्ध 15 वर्षाच्या एका विद्यार्थ्याला न्यूड फोटो पाठवल्याचा आरोप आहे. अमेरिकेत 2014 मध्ये मिस केंटकीचा खिताब तिने जिंकला आहे. बीयर्स पश्चिम वर्जिनियामध्ये एका शिक्षिका म्हणून काम करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांच्या पालकांना बीयर्स विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलाला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा बीयर्सचा माजी विद्यार्थी होता. जेथे बीयर्स आधी शिक्षिका होती. अधिकाऱ्यांच्या मते, बियर्सने स्नॅपचॅटवर न्यूड फोटो पाठवल्याचा आरोप स्विकारला आहे. या प्रकरणात तिने तिची बाजु मांडण्यासाठी वकील घेतला आहे की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


बीयर्सविरुद्ध लावलेल्या आरोपांवर पोलिसांनी अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. जर हे आरोप सिद्ध झाले तर बीयर्सला शिक्षा होऊ शकते. सोबतच तिला दंड देखील भरावा लागू शकतो.