Viral Video : सोशल मीडियावर ज्या प्रमाणात मनोरंजनाचे व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यात काही व्हिडीओ अतिशय भयावह आणि भीतीदायक असतात. काही व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा येतो. सोशल मीडियाच्या जगात रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील व्हिडीओ पाहून तर हृदयाचे ठोके चुकविणारे असतात. सध्या एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. (bees spoiled woman face after she ate honey from hive watch viral video today google Trending News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, या व्हिडीओमध्ये एका महिलेला मधमाशाच्या पोळ्यातील मध चोरणं अंगाशी आलं. या महिलेला या कृत्याचे पुढे काय होईल याची कल्पना नव्हती कदाचित म्हणून ती एवढी मोठी गोष्ट करुन बसली. या महिलेने थेट मधमाशाच्या पोळ्यातून मध खाण्यास सुरूवात केली. त्यानंतर मधमाश्यांनी तिच्यावर हल्ला केला. 


या हल्ल्यामध्ये महिलेच्या चेहऱ्याची अवस्था बघून धक्काच बसेल. या महिलेचा उजवा ओठ आणि उजवा डोळाही सुजला आहे. या हल्ल्यात या महिलेचा संपूर्ण चेहराच बिघडला आहे. 


आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये मधमाश्यांनी हल्ल्या केल्यानंतरही ही महिला शांतपणे पोळ्यातील मध खाताना दिसत आहे. 


खरं तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एडिटर करण्यात आल्याच जाणवतो. महिलेने फिल्टरचा वापर करुन हा व्हिडीओ तयार केला असल्याचं दिसून येतं आहे. एका यूजर्सनेही महिलेच्या विकृत चेहऱ्याला फिल्टरचा वापर केल्याचं म्हणटलं आहे. 




हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इन्स्टाग्रामवरील bilal.ahm4d या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत.