मुंबई: इस्रायलमधील संघर्षानंतर बेन्जामिन नेत्यानाहू आपलं सिंहासन वाचवण्यात अपयशी ठरले आहेत. एक तप म्हणजे तब्बल 12 वर्ष इस्रायलवर राज करणाऱ्या नेत्यानाहू यांचं राज संपुष्टात आलं आहे. नेत्यानाहू यांचा नफ्ताली बेनेट यांनी पराभव केला. सलग 12 वर्ष पंतप्रधान राहिलेल्या नेत्यानाहू यांची जागा आता बेनेट यांनी घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रायलच्या संसदेत रविवारी यामिना पक्षाचे प्रमुख बेनेट यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारला कौल दिला. 60 विरुद्ध 59 अशा फक्त एका मतानं नव्या आघाडीनं विजय मिळवला. नव्या आघाडीलाही हा विजय अगदी नसटताच मिळाला मात्र नेत्यनाहू यांचा पराभव करण्यात नव्या आघाडीला यश आलं. 


 WIONने दिलेल्या वृत्तानुसार इस्त्राईलमधील 8 पक्ष एकत्र मिळून हे नवीन सरकार स्थापन करणार आहेत. या 8 पक्षांच्या युतीचे नेतृत्त्व यामिना पार्टीचे  49 वर्षीय नेता नफ्ताली बेनेट करतील अशी माहिती मिळाली आहे. नव्या सरकारमध्ये 27 मंत्री असून त्यातील 7 महिला आहेत. नवीन सरकारसाठी वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन युती केली आहे. त्यांच्यापैकी उजव्या विंग, डावे, मध्यवर्तीसमवेत अरब समुदायाचा एक पक्ष आहे.


पराभव झाल्यानंतर नेत्यनाहू यांच्या पक्षाने आणि समर्थकांनी खूप गदारोळ केला. तर आम्हाला गर्व आहे वेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन काम करतात अशी प्रतिक्रिया बेनेट यांनी दिली आहे. आता या नव्याचे पडसाद आणि जगातील व्यापारावर काय परिणाम होणार ते येत्या काळात दिसून येईल.