कमला हॅरीस पार पाडणार राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी, हे आहे कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत. कोलोनोस्कोपीसाठी बायडेन यांना भूल देण्यात येईल आणि या काळात ते अमेरिकेच्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या स्थितीत नसतील. त्यामुळेच कमला हॅरिस ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. (Biden temporarily transferring power to Vice President kamla Harris)
सीएनएनच्या वृत्तानुसार, कमला हॅरिस या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला असतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वर्षातून एकदा नियमित तपासणीसाठी वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये पोहोचले आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच त्यांची तपासणी होणार आहे. यापूर्वी, बायडेन यांच्या प्रकृतीबाबतचे शेवटचे अपडेट डिसेंबर 2019 मध्ये समोर आले होते. तेव्हा त्यांचे वय 77 वर्षे होते. ते निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. शनिवारी 79 वर्षांचे बायडेन यांनी तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीचा संपूर्ण अहवाल जारी केलेला नाही.