Big Breaking: फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करून अनेकांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सहाहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्लेखोरांना ठार मारले आहे. 



आज (11 जानेवारी 2023) सकाळी माथेफिरू रेल्वे स्थानकावर आला. त्याने रेल्वे स्थानकातील दिसेल त्या प्रवाशाल चाकूने भोसकण्यास सुरूवात केली. या घटनेने एकच खळबळ माजली. चाकूहल्यात सहाजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर रेल्वेसेवाही काही विस्कळीत झाली होती.