Discovery : मानवी आयुष्यात काही हजार वर्षांपूर्वीच्या काळात डोकावून पाहिल्यास असे संदर्भ मिळतात, ज्यावर विश्वासही ठेवणं अशक्य. अशीच एक अविश्वसनीय गोष्ट अमेरिकेतील पेरू या देशातून समोर आली आहे. जिथं पुरातत्वं विभागाच्या एका टीमला देशाच्या राजधानीच्या सीमेपासूनच काही अंतरावर असणाऱ्या हुअर्मे टाउनजवळ वारी साम्राज्याचा एक अतिप्राचीन मकबरा सापडला आहे. जिथं सात मानवी शरीराचे अवशेष सापडले आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार इसवीसन 500 ते 1000 दरम्यान वारी साम्राज्य अस्तित्वात होतं. (Big Discovery archaeologists pure gold silver treasures in peru)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, उत्खननातून मिळालेल्या अवशेषांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन तारुण्यावस्थेतील व्यक्तींचे अवशेष दिसत आहेत. जमिनीखाली कित्येक वर्षे दडललेल्या या गोष्टी समोर आल्या आणि पाहणारेही हैराण झाले. 


अधिक वाचा : Superb! युरोपीय देशात राहायला या आणि लाखो रुपये मिळवा; तिकीटासह इतरही खर्चाची चिंता नको...


 


काही हजार वर्षांपूर्वी शुद्ध सोनं- चांदी (pure gold silver treasures ) कसं होतं ते उत्खननात समोर आलेल्या गोष्टी पाहून लक्षात येत आहे. सोन्या- चांदीचे दागिने, तांब्याची हत्यारं, सुऱ्या- कुऱ्हाडी, कपडे, लाकडाचे साहित्य, चामड्यापासून तयार करण्यात आलेल्या अनेक वस्तू यावेळी जगासमोर आल्या. 


सोन्याची वस्तू

चांदीची नाणी 

2012 मध्येही समोर आलेले असेच अवशेष... 
सध्या सापडलेल्या मकबऱ्यापासून काही अंतरावरच 2012 मध्ये Miłosz Giersz  आणि त्यांची पत्नी Prządka-Giersz यांना एक मोठा मकबरा आढळून आला होता. जिथं तीन उच्चवर्गीय महिलांचे अवशेष सापडले होते. सूत्रांच्या माहितीनुसार ते अवशेष वारी साम्राज्यातील महाराण्यांचे होते. 


इसवीसन 500 ते 1000 दरम्यान वारी साम्राज्य पर्वतीय भागांमध्ये वास्तव्यास होते. समुद्रकिनारी भागांमध्येही त्यांचा वावर होता. या साम्राज्याची खरी ओळख त्यांच्या कलाकुसरीमुळे होती. सोन्याचांदीच्या भांड्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कलेची छाप सोडली होती. इतिहासकारांच्या मते 1200 A.D. नंतर या साम्राज्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला.