खबरदार, सहमतीशिवाय अश्लील फोटो शेअर केला तर...
ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर कुणाच्याही परवानगीशिवाय त्याचा/तिचा अश्लील फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला तर संबंधित व्यक्तीला दंडाची तरतूद करण्यात आलीय.
सिडनी : ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर कुणाच्याही परवानगीशिवाय त्याचा/तिचा अश्लील फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला तर संबंधित व्यक्तीला दंडाची तरतूद करण्यात आलीय.
एखाद्याच्या परवानगिशिवाय त्यांचा अश्लील फोटो शेअर करणाऱ्यांसोबतच सोशल वेबसाईटलाही यासाठी दंड भरावा लागणार आहे.
प्रस्तावित कायद्यानुसार, असं कृत्य करणाऱ्याला १.०५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर तर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल साईटसना ५.२५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
एखाद्याचा सूड घेण्यासाठी अशा प्रकारची कृत्यं सोशल मीडियावर होत असल्याचं समोर आलं होतं. अशा घटनांना आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियात हा नवीन कायदा तयार करण्यात आलाय.