पुण्याहून अरुण मेहेत्रे, झी २४ तास, मुंबई : यंदा पावसानं (Maharashtra Monsoon) जोरदार सुरूवात केली. सुरुवातीच्या काही महिन्यात धो-धो बरसणऱ्या पाऊसाने मात्र ऑगस्टमध्ये दडी मारली. एकाही जिल्ह्यात 60 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला नाही. त्यात आता सप्टेंबरमध्ये पावसाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पावसाला वारंवार ब्रेक कशामुळे लागतोय. दुष्काळाचं (Drought) सावट कशामुळे येणार हे आपण या रिपोर्टमधून जाणून घेऊयात. (biggest blow to agriculture due to climate change farmers is likely to face more crisis) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ऑगस्टमध्ये पावसानं मोठ्ठा ब्रेक घेतला. पावसाच्या या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांवर (Farmers) महाभयंकर संकट येण्याची शक्यता आहे. पण पावसाच्या या ब्रेकला कोण जबाबदार आहे? जून आणि जुलैमध्ये जोरदार एन्ट्री घेतलेला पाऊस ऑगस्टमध्ये गायब झाला. या गायब झालेल्या पावसानं शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली आहे. पावसाच्या या गायब होण्याला कारण ठरलंय ते मोठ्या प्रमाणात झालेलं वायूप्रदूषण. संयुक्त राष्ट्रांच्या क्लायमेट चेंज अहवालात धक्कादायक सत्य समोर आलंय.


शेतकऱ्यांवर महाभयंकर संकट?


वायू प्रदूषणामुळे पाऊस अनियमित झाला आहे. नैऋत्य मौसमी पावसाचं प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी कमी होणार आहे. काही ठिकाणी तर पावसाचं प्रमाण तब्बल ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतं. प्रदूषणामुळे सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तापमान अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. ढग निर्माण होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो आणि परिणामी पाऊस कमी पडतो.


ऑगस्टमध्ये पावसानं दडी मारली. त्यामुळे देशात दुष्काळ पडण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. एकीकडे वाढतं प्रदूषण आणि निसर्गावरचे अत्याचार यामुळे काय घडतं हे निसर्गानं अनेकवेळा दाखवून दिलंय. वायूप्रदूषणाला वेळीच गांभीर्यानं घेतलं नाही तर भविष्यात सगळं निसर्ग चक्रच बिघडण्याची भीती आहे. त्याचे गंभीर परिणाम माणासाला भोगावे लागणार आहेत.