लाहौर: पाकिस्तानच्या लाहौरमध्ये बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामध्ये 15 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा हल्ला दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ झाल्याची माहिती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ रिपोर्टनं दिलेल्या माहितीनुसार पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून नेमका हल्ला कुणी कशासाठी केला याबाबत तपास सुरू आहे. हा धमका इतका जबरदस्त होता की आजूबाजूच्या इमारती-घरांच्या काचाही फुटल्या.



झालेल्या हल्ल्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 15 जखमी आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटामुळे घटनास्थळावरील गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जखमींना जिन्ना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.