लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन यांची निवड करण्यात आली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीची निवडणूक चुरसीची झाली. थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदासाठी ही निवडणूक झाली. बोरिस जॉन्सन आणि जेरेमी हंट यांच्यात खरी लढत पाहायलाम मिळाली. अखेर बोरिस जॉन्सन यांनी बाजी मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थेरेसा मे यांनी आपल्या राजीनाना दिल्यानंतर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान कोण, याची चर्चा सुरु झाली होती. थेरेसा मे यांचा वारसदार कोण असणार याकडे लक्ष लागले होते. बोरिस जॉन्सन आणि जेरेमी हंट यांच्यात थेट लढत झाली. थेरेसा मे यांनी 'ब्रेक्झिट'च्या मुद्द्यावरून राजीनामा दिला. त्यानंतर ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली. मात्र, पंतप्रधान पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात बोरिस जॉन्सन यांनी बाजी मारली.


पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी हुजूर पक्षाचे माजी परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन यांच्या नावाची घोषणा झाली. तर त्यांच्याविरोधात परराष्ट्र सचिव जेरेमी हंट हे निवडणूक रिंगणात होते. तर हुजूर पक्षाच्या नेतेपदासाठी ११ जण इच्छुक होते. त्यात बोरीस जॉन्सन यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाले तर आपण राजीनामा देणार असल्याचे ब्रिटनचे अर्थमंत्री फिलीप हेमंड यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता बोरिस पंतप्रधान झाल्याने अर्थमंत्री राजीनामा देणार का, याचीही उत्सुकता आहे.


दरम्यान, थेरेसा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत. आजच्या निकालानंतर थेरेसा मे 'हाउस ऑफ कॉमन्स'ला संबोधित करणार आहेत. त्यानंतर बकिंगहॅम पॅलेस येथे जाऊन राणी एलिझाबेथ यांच्याकडे राजीनामा सोपवतील. त्यानंतर ब्रिटनच्या राणी नवीन पंतप्रधानांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतील.