अन्नाची नासाडी टाळण्यासाठी `या` हॉटेल मालकाने राबवलाय अनोखा उपक्रम!
एकीकडे भूकबळी जात असताना मोठमोठ्या हॉटेल्स किंवा अगदी घरातून देखील बरेच अन्न वाया जाते.
नवी दिल्ली : एकीकडे भूकबळी जात असताना मोठमोठ्या हॉटेल्स किंवा अगदी घरातून देखील बरेच अन्न वाया जाते. जगभरात प्रत्येक दिवसाला अब्जावधी अन्न वाया जात असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे.
अन्नाची नासाडी टाळण्यासाठी अनेक समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्था विविध उपक्रम राबवतात. अशा प्रकारे काम करणाऱ्या अनेक संस्था, समाजसेवक हॉटेल्समधलं उरलेलं अन्न घेऊन जातात आणि भुकेल्या गरिबांमध्ये त्याचे वाटप करतात. याच संकल्पनेतून प्रेरणा घेत मायकल ब्रेक या हॉटेल मालकानं अनोखा उपक्रम राबवला आहे.
मॅनचेस्टरमध्ये ‘बोसू बॉडी बार’ नावाचं मायकल ब्रेक यांचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अन्न उरतं. उरलेलं अन्न फेकून न देता मायकल ते गरिबांना देतात. मात्र त्यासाठी त्यांनी एक अनोखी कल्पना आमलात आणली आहे. ते उरलेले अन्न एका छोट्या कागदी पिशवीत भरतात आणि त्यावर संदेश लिहितात. हॉटेल बंद झाल्यावर त्या पिशव्या बाहेर ठेवतात. अन्नाव्यतिरिक्त थंडीसाठी स्कार्फ, आणि इतर साहित्यदेखील त्यात असतं.
मायकल यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. तसंच ही संकल्पना सर्वांनाच आवडली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.