एडिनबर्ग : स्कॉटलंडच्या एडिनबर्गमधून एक भयानक घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला मोठा धक्काच बसेल, येथे एका माणसाने आपल्या मैत्रिणीला उंदराचे घरटे खाण्यास भाग पाडले आहे. ज्यानंतर त्याने तिला खिडकीबाहेर फेकून दिले. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.


प्रेयसीवर प्रियकराचा अत्याचार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पीडितेचे नाव फ्लॅनागन आहे. तिचे वय 28 वर्षे आहे. पीडितेने सांगितले की, तिच्या प्रियकराची मानसिक स्थिती चांगली नाही. तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा.


मुलीने सांगितले की, तिच्या प्रियकराने तिला घराच्या खिडकीतून फेकून दिल्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याला प्रियकराकडून मारहाण होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.


ती पुढे म्हणाली की, बॉयफ्रेंडला त्याच्यासंबंधीत प्रत्येक गोष्ट नियंत्रित करायची होती. ती कोणते कपडे घालणार आणि ती कुठे पैसे खर्च करणार, हे सगळं तिच्या बॉयफ्रेंडच ठरवायचा आणि तिला त्याचं ऐकायला भाग पाडायचा. गर्लफ्रेंडने पोलिस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रार केली पण त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही.


तिच्या बॉयफ्रेंडचे तिने ऐकले नाही त्यामुळे त्याने रागाने तिला उंदराचं घरटं खायला लावलं आणि त्यानंतर तिला खिडकीतून खाली देखील फोकून दिलं. पोलीसांनी या प्रकरणात निष्काळजी पणा केला, ज्यामुळे आज या पीडितेचं ऐवढं मोठं नुकसान झालं.


न्यायालयाने आरोपी या गंभीर प्रकरणा संबंधीत साडेचार वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्याला तुरुंगात पाठवले. पण पीडित मुलीचा असा विश्वास आहे की, तिच्या प्रियकराला तुरुंगात टाकू नये तर मानसिक स्थितीच्या उपचारासाठी रुग्णालयात पाठवावे. जेणे करुन त्याला लवकर बरं होण्यात मदत होईल.