नवी दिल्ली : कोणत्याही एकाच देशात नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कित्येक देशातील नागरिक तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा महामारीच्या परिस्थितीत राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ब्राझील देशाला Corona Vaccineची गरज नाही आणि आम्ही ती घेणार देखील नाही, असं ते म्हणाले. शिवाय जगभरात  Corona Vaccine संदर्भात होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकांवर देखील प्रश्न उपस्थित केला. दरम्यान त्यांचं हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती जेअर  बोलसोनारो म्हणाले, 'मी तुम्हाला सांगत आहे. मी Corona Vaccine घेणार नाही आणि हा माझा हक्क आहे.' राष्ट्रपतींचं हे वक्तव्य सध्या तुफान व्हायरल होत आहे. शिवाय त्यांनी मास्कवर देखील प्रश्न उपस्थित केले. ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


ऐकीकडे कोरोनावर मात करण्यासाठी मास्क एक शस्त्र असल्याचं सांगितलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेसोबतच अनेक संस्थांनीही कोरोना युद्धात विजय मिळवायचा असेल तर मास्क हेच प्रभावी शस्त्र असल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे मात्र जैर बोलसोनारो यांनी मास्कवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, ब्राझीलमध्ये करोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.