Pool Game सुरु असतानाच काही मिनिटात पडला रक्ताचा सडा; CCTV पाहून धक्का बसेल
ब्राझीलमध्ये (Brazil) सात लोकांची हत्या करण्यात आल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. आरोपीने सातही लोकांना गोळ्या घालून घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे.
ब्राझीलमध्ये (Brazil) एका व्यक्तीने सातजणांची गोळ्या (Firing) झाडून निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. New York Post च्या वृत्तानुसार, पूल हॉलमध्ये (Pool Hall) हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराचं कारण आणखीनच धक्कादायक आहे. पूल गेममध्ये पराभव झाल्यानंतर हॉलमध्ये उपस्थित असणारे हसू लागल्याने त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. मृतांमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
Sinop शहरात ही घटना घडली आहे. याठिकाणी पूल गेम खेळत असताना दोघेजण सलग दोन वेळा हारले. यानंतर तिथे हॉलमध्ये असणारे सर्वजण हसू लागले. यामुळे त्यांनी संतापून गोळीबार केला आणि सगळ्यांना ठार केलं. Edgar Ricardo de Oliveira आणि Ezequias Souza Ribeiro अशी आरोपींची नावे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Oliveira हा पहिला गेम हारला होता. यानंतर तो Ezequias सह परतला आणि त्या खेळाडूला पुन्हा आव्हान दिलं. मात्र दुसऱ्या वेळीही त्याचा पराभव झाला. सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्याने तिथे खेळ पाहणारे सर्वजण हसू लागले. यामुळे Oliveira संतापला आणि त्याने पिकअप ट्रकमधून शॉर्टगन काढली. यावेळी Ezequias ने सर्वांना पिस्तूलचा धाक दाखवत भिंतीकडे उभं केलं होतं.
Oliveira ने यावेळी पूलच्या मालकासह इतरांवर गोळीबार केला. या गोळीबारात सहाजणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाने रुग्णालयात उपचारादरम्यान जीव गमावला. पोलिसांनी मृतांची नावं जाहीर केली आहेत. Larissa Frasao de Almeida, Orisberto Pereira Sousa, Adriano Balbinote, Getulio Rodrigues Frasao Junior, Josue Ramos Tenorio आणि Maciel Bruno de Andrade Costa अशी त्यांची नावं आहेत.
यावेळी एक महिला मात्र वाचली. गोळीबार सुरु झाल्यानंतर तिने हात वर केले असता आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.