लग्नाला नक्की या पण किमान 4 हजारांचं Gift घेऊन! नवरीने पत्रिकेत छापली आग्रहाची ओळ
Bride Demanding Gifts Worth Rs 4000: या तरुणीने स्वत:च्या लग्नपत्रिकेमध्ये यासंदर्भातील टीप छापली आहे. तसेच या तरुणीने आपण अशापद्धतीची मागणी का करतोय याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं असून ही मागणी योग्य कशी आहे हे सांगितलं आहे.
Bride Demanding Gifts Worth Rs 4000: लग्नासंदर्भातील अनेक गोष्टी आणि हटके आमंत्रणांबद्दल तुम्ही यापूर्वी वाचलं असेल, पाहिलं असे किंवा अगदी अनुभवलंही असेल. मात्र सध्या एका अशा नवरीची चर्चा आहे जीने एक अजबच मागणी आपल्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांकडे केली आहे. सामान्यपणे लग्नाला जाणारे पाहुणे त्यांच्या इच्छेनुसार आणि ऐपतीनुसार नवदांपत्याला भेटवस्तू म्हणजेच गिफ्ट घेऊन जातात. मात्र एका नवरीने तिच्या लग्नाच्या पार्टीला पाहुण्यांना आमंत्रित करताना येताना छोटं गिफ्ट घेऊन येऊ नये असं फर्मानच सोडलं आहे.
स्वस्त गिफ्ट नकोत
सामान्यपणे लग्नात गिफ्ट काय मिळणार याबद्दल लोक फारसा विचार करत नाही. महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी पत्रिकेतच आहेर, भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाही असं थेट लिहिलेलं असतं. मात्र या नवरीने स्वत: लग्नामध्ये गिफ्टची मागणी केली आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांनी गिफ्ट घेऊन यायचं इतकंच न सांगता या नवरीने या गिफ्टची किमान किंमत किती हवी याबद्दलही पाहुण्यांना उघडपणे निर्देश दिले आहेत. 'मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, या नवरीने पाहुण्यांना आमंत्रित करताना जेव्हा माझ्या लग्नाला याल तेव्हा कमीत कमी 4 हजार रुपयांचं गिफ्ट घेऊन यावं असं सांगितलं आहे. म्हणजेच स्वस्त गिफ्ट घेऊन जाणाऱ्यांना या लग्नाला जाता येणार नाही.
...म्हणून गिफ्ट महागडीच हवीत
या नवऱ्या मुलीची फेसबुक आणि रेडिट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. माझ्या लग्नाला कोणी रिकाम्या हातानेच म्हणजेच कोणतीही भेटवस्तू न आणता आलं तर मला फार वाईट वाटेल. कारण आम्ही लग्नाला जेवणारी आणि मद्यपानाची सोय केली असून याचा खर्च किमान 12 हजार रुपये इतका आहे. त्यामुळेच आम्हाला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू थोड्या तरी दर्जेदार असाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. म्हणूनच लग्नपत्रिकेमध्येच गिफ्ट हे किमान 4 हजार रुपयांचं असावं असं या मुलीने स्पष्टपणे नमूद केलं आहे. तसेच पोस्टच्या शेवटी तिने प्रश्न गिफ्टचा नाही. मात्र गिफ्ट मागणे ही काही वाईट गोष्ट नाही, असा युक्तीवादही केला आहे.
लोकांची यावरुन मतमतांतरे
ब्रिटनमधील या तरुणीची लग्नासंदर्भातील ही पोस्ट व्हायरल झाली असून अनेकांनी या मुलीचा विचार फारच स्वार्थी असल्याचं म्हटलं आहे. लग्नाला येणाऱ्या व्यक्ती प्रेमाने भेटवस्तू आणतात त्याचं मोजमाप पैशांमध्ये करता कामा नये, असा सल्ला एकाने दिला आहे. समोरची व्यक्ती किती प्रेमाने भेटवस्तू देते हे अधिक महत्त्वाचं असतं. या ठिकाणी भावनांचा आधी आदर झाला पाहिजे असं मत बऱ्याच जणांनी व्यक्त केलं आहे. मात्र काहींनी या मुलीने जे हवंय ते उघडपणे सांगितलं हे योग्य असल्याचंही म्हटलं आहे. मात्र या मुलीची बाजू घेणाऱ्यांची संख्या ही फारच कमी आहे.