Britain Royal Family :  राजघराण्यांचा उल्लेख जेव्हाजेव्हा होतो तेव्हातेव्हा सर्वप्रथम नाव आठवतं ते म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्याचं. भारतापासून अगदी संपूर्ण जगापर्यंत या राजघराण्याविषयी आणि त्यातील सदस्यांविषयी कुतूहल पाहायला मिळतं. पण, ज्याप्रमाणं नाण्याला दोन बाजू असतात अगदी त्याचप्रमाणं ब्रिटनच्या राजघराण्याचेही अनेक पैलू आहेत. काही पैलू सर्वांच्या आवडीचे, तर काही मात्र गडद आणि गंभीर. सध्या हे कुटुंब चर्चेचा विषय ठरतंय ते म्हणजे एका अशा घटनाक्रमामुळं जिथं खऱ्या अर्थानं इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हटलं जात आहे की, राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आणि ब्रिटनच्या सिंहासनाचे पुढील दावेदार प्रिन्स विलियम आणि प्रिन्सेस केट (prince william and kate middleton) यांच्या नात्यामध्ये सध्या काहीशी तणावाची परिस्थिती आहे. यामागं कारण ठरतेय ती म्हणजे प्रिन्स विलियम यांची Lady Rose Hanbury नावाच्या महिलेशी वाढती जवळीक. 


केटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रिन्स विलियम यांची ही कृती अनेकांना सुन्न करून जात आहे. पण, एकंदर चर्चा आणि सोशल मीडियावरील छायाचित्र पाहता त्यांचं लेडी रोझ यांच्याशी असणारं नातं औपचारिकतेपलिकडे असल्याचं स्पष्ट होत आहे. 2019 पासूनच त्यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती. पण, गेल्या काही दिवसांत या नात्यानं अनेकांचं लक्ष वेधलं.  7th Marquess of Cholmondeley मधील डेव्हिड कोलमॉन्डिले यांची पत्नी लेडी सारा रोझ यांनी यंदाचा व्हॅलेन्टाईन्स डेसुद्धा ब्रिटनच्या राजघराण्यातील या राजकुमारासोबत व्यतीत केला. सोशल मीडियावर प्रिन्सचा याच दिवसाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दिसणारी 'ती' महिला केट नसून, लेडी रोझ होत्या हे आता उघड झालं आहे. 


वडिलांनी जे केलं तेच मुलगा... 


प्रिन्सेस डायना (Princes Diana) आणि (Prince Charles III) प्रिन्स चार्ल्स (सध्याचे राजे चार्ल्स) यांच्या लग्नाच्या आधीपासूनच त्यांचं कॅमिला यांच्याशी असणारं नातं वादाचा विषय ठरलं होतं. राजघराण्यातील लग्नानंतरही डायना आणि प्रिन्स यांच्या नात्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कॅमिला पार्कर यांची हजेरी असायची. किंबहुना पतीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांची कल्पना असतानाही प्रिन्सेस डायना मात्र कॅमिला यांच्याशी मैत्रीचं नातं टिकवून होत्या असं म्हटलं गेलं.



हेसुद्धा वाचा : मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये? 


इथं प्रिन्स विलियम, किंवा प्रिन्स ऑफ वेल्ससुद्धा वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत, अर्थात ही बाब मात्र अनेकांसाठीच स्वागतार्ह नाही. कॅमिलाप्रमाणंच लेडी रोझसुद्धा ब्रिटनच्या राजघराण्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक खासगी समारंभांमध्ये पाहायला मिळतात. किंग चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेकावेळीसुद्धा लेडी रोझ तिथंच पाहायला मिळाल्या. लेडी रोझ यासुद्धा ब्रिटनच्या राजघराण्याशी घनिष्ठ संबंध असणाऱ्यांच्या यादीत येतात. पण, त्यांचं आणि प्रिन्स विलियम यांचं नातं मात्र प्रिन्सेस केट/ प्रिन्सेस ऑफ वेल्स यांना लेडी डायनाप्रमाणंच दु:ख देणार का? हाच निराशाजनक प्रश्न आता केट समर्थक आणि ब्रिटनच्या राजघराण्याविषयी कुतूहल असणारे विचारू लागले आहेत.