नवी दिल्ली : वाघीण आणि म्हैस यांच्यात झालेल्या झुंजीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर एखाद्याने तुम्हाला विचारलं की, म्हैस आणि वाघीण यांच्यात झुंज झाली तर कोण जिंकेल? अर्थात तुमचं उत्तर असेल की वाघीणचं असेल. पण एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल.


आतापर्यंत लाखो नागरिकांनी पाहिला व्हिडिओ


म्हैस आणि वाघीण यांच्यात झालेल्या झुंजीचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो नागरिकांनी पाहिला आहे. या व्हिडिओत म्हैस आणि वाघीण यांच्यात झुंज होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.


वाघीण एका ठिकाणी शांत बसलेली होती त्याच दरम्यान एक म्हैस वाघीणीच्या दिशेने येते आणि तिच्यावर हल्ला करते. सोशल मीडियात व्हायरल झालेला हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकातील क्रुर नॅशनल पार्कचा आहे.



व्हिडिओत आपल्याला पहायला मिळत आहे की, काही म्हशी जंगलातुन जात आहेत. त्याच दरम्यान त्यापैकी एका म्हशीची नजर वाघीणीवर पडते आणि ती वाघीणीच्या दिशेने जोराने धावत जाते. 


यानंतर म्हैस आपल्या शिंगाने वाघीणीला उचलते. इतकचं नाही तर, म्हशीने आपल्या शिंगाने वाघीणीला हवेत उडवत. आश्चर्य वाटेल पण, या वाघीणीने म्हशीवर हल्लाच केला नाही. ही संपूर्ण घटना पार्कात असलेल्या एका गाईडने आपल्या मोबाईलमध्ये कैद करत यूट्युबवर व्हिडिओ अपलोड केला.


पाहा व्हिडिओ...



ज्या वाघीणीवर म्हशीने हल्ला केला तिची प्रकृती खूपच खराब असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळेच कदाचीत या वाघीणीने म्हशीवर हल्ला केला नसावा.