नवी दिल्ली : इराणची राजधानी तेहरानवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच युक्रेनचं बोइंग ७३७ हे प्रवासी विमान जमिनीवर कोसळलं. बुधवारी घडलेल्या या विमान अपघातात १७६ नागरिक जागीच ठार झाले. यामध्ये ६३ कॅनडा नागरिक उपस्थित होते. हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, आता मात्र अमेरिकेच्या मित्रदेशाकडून याबाबत वेगळाच दावा केला गेलाय. इराणच्या मिसाइल हल्ल्यात विमान कोसळल्याचा दावा अमेरिकेशी जवळचे संबंध असलेल्या कॅनडानं केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हा दावा केलाय. आपल्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आपण हा दावा करत असल्याचं ट्रु़डो यांनी सांगितलंय. इराणनं मात्र कॅनडाचा हा दावा फेटाळून लावलाय. कॅनडाकडे असेलली कोणतीही गुप्त रिपोर्ट सादर करण्याचं आवाहनचं इराणनं केलंय. 


दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या मिसाइलनं युक्रेनचं विमान पाडल्याचा दावा केलाय. इराणनं हे सर्व दावे फेटाळून लावलेत. 



उल्लेखनीय म्हणजे, कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स देण्याची मागणी युक्रेननं केली होती. परंतु, इराणनं हा ब्लॅक बॉक्स देण्यास नकार दिलाय. इराण रेड क्रिसेंट सोसायटीचे उपप्रमुख इब्राहिम ताजिक यांनी, दुर्घटनेच्या कारणांची चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय. 


महत्त्वाचं म्हणजे, तेहरानमध्ये युक्रेनच्या दूतावासानंही इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचं आणि त्याचा दशतवादाशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलंय. 


अधिक वाचा : इच्छा असूनही डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध युद्ध पुकारू शकणार नाहीत कारण...


अधिक वाचा : निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प इराणचा वापर करतायंत का?


अधिक वाचा : तिसरं विश्वयुद्ध झालंच तर कुणाची साथ कुणाला मिळणार? भारत कुणासोबत उभा राहणार?


अधिक वाचा : अमेरिकन दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला, संघर्ष अधिक तीव्र


अधिक वाचा : भूकंपाच्या धक्क्यानंतर इराणमध्ये कोसळलं युक्रेनचं प्रवासी विमान, १६७ ठार