जेरूसलेम : दरवर्षी लग्नसराईचा मौसम येतो त्यानंतर नवोदित दांपत्य हनीमूनसाठी देशविदेशात रवाना होतात. अशावेळी लाखो रुपये खर्च होत असतात. पण तुम्ही विचार केलाय का ?, एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही हनीमूनला गेलायत आणि रिटर्न येताना एक, दोन हजार नाही तर ६७ लाख रुपये मिळतायत ? माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार असेही एक हॉटेल आहे जिथे हनीमून साजरा करणाऱ्या कपलला ६७ लाख रुपये आणि येण्याजाण्याचा खर्चही दिला जातो. जर तुम्हाला अजूनही विश्वास बसत नसेल तर ऐकाच. इस्त्रायलच्या एका हॉटेलमध्ये काही नियम अटींसह ही मजेदार ऑफर ठेवण्यात आली आहे. राजधानी यरुशलेमच्या येहूदा हॉटेल दर ४ वर्षांनी कपल्ससाठी एक मजेदार ऑफर घेऊन येतं. चार वर्षांशी याचा काय संबंध ? असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. इस्त्रायलची भाषा हिब्रूनुसार लीप ईयर ज्या फेब्रुवारीच्या २९ ला असेल ते शुभ मानलं जातं. इथे लीप ईयरला हिब्रुमध्ये प्रेग्नेंट ईयर मानंल जात. 


६७ लाख आणि सर्व खर्च  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी हॉटेल लीप ईयरमध्ये कपल्सला ऑफर देत. जर कोणती महिला २९ फेब्रुवारीला गर्भवती राहिली तर तिला ९९,३०० डॉलर म्हणजेच ६७ लाख रुपये दिले जातील. यासोबतच येण्याजाण्याचा सर्व सुविधांसहित खर्च उचलला जातो. पण हॉटेलची ही अट पूर्ण होत नाही. २९ फेब्रुवारीला गर्भवती होणाऱ्या पहिल्या २ महिलांनाच ही ऑफर लागू होते. 


डॉक्टरांकडून तपासणी 


या सर्व प्रकारात पारदर्शकता आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जातो. डॉक्टरांची टीम या ऑफरमध्ये सहभागी होणाऱ्य कपल्सची तपासणी करते. महिला हॉटेलमध्ये येण्याआधीच गर्भवती नाही ना ? किंवा २९ फेब्रुवारीला ती गर्भवती झाली की नाही ?  याची डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. हे जेवढ दिसत तेवढ नाही. पण हॉटेलला यापासून फायदा नक्की मिळतो. हा त्यांच्या हॉटेलच्या मार्केटींगचा एक भाग आहे. यामुळे फेब्रुवारीमध्ये हॉटेलला येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याचेही हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.