मुंबई : जेव्हा आपल्याला कोणाची आठवण येते तेव्हा आपण त्याला मेसेज किंवा फोन करतो. मात्र आपला प्रिय व्यक्ती या जगातून निघून गेला तर त्याची उणीव जाणवते. कधी परिस्थिती अशी येते की, तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीशी बोलावेसं वाटतं. तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, असा एक टेलिफोन बूथ आहे ज्यावरून लोक त्यांच्या मृत नातेवाईकांशी बोलतात. हे टेलिफोन बूथ स्मशानभूमीत आहे. हे टेलिफोन बूथ जपानच्या ओत्सुची शहरात पॅसिफिक महासागराच्या जवळ आहे.


या टेलिफोन बूथवर एक मुलगा रोज यायचा


रिपोर्ट्सनुसार, एक लहान मूल दररोज या टेलिफोन बूथवर येत असायचा. जेव्हा लोकांनी मुलाला विचारलं की, तो दररोज या ठिकाणी का येतो, तेव्हा मुलाने उत्तर दिलं की, तो आजोबांशी बोलतो. या मुलाचे आजोबा 2015 च्या जपान त्सुनामीमध्ये मृत पावले होते. 


मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून इतर लोकही या टेलिफोन बूथवर पोहोचू लागले. असे लोक येथे येऊ लागले ज्यांच्या प्रियजनांचा अंत्यविधी या स्मशानात करण्यात आला होता. 


अनेकांनी केला बोलल्याचा दावा


हे टेलिफोन बूथ इटारू सासाकी नावाच्या व्यक्तीने आपल्या भावाच्या स्मरणार्थ उभारलं होतं. त्यामध्ये, फोनसह, एक नोटबुक ठेवली ज्यामध्ये प्रियजनांसाठी संदेश लिहिता येतील. त्यानंतर त्याने तो टेलिफोन प्रथम वापरला. त्यानंतर या फोन बुथवर अनेक लोक आपल्या मृत नातेवाईकांशी बोलण्यासाठी आले असून अनेकांनी आपले आणि मृताच्या कुटुंबीयांमध्ये संभाषण झाल्याचा दावा केला आहे.



कनेक्शन नाही


इटारू सासाकीच्या या फोनला कुठूनही कनेक्शन नाही. त्याची वायर बूथच्या दुसऱ्या बाजूला लटकलेली आहे. पण तरीही इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपला संदेश आपल्यापर्यंत पोहोचल्याचं जाणवतं. यानंतर लोक आपला संदेश जवळ ठेवलेल्या नोटबुकमध्ये लिहून निघून जातात.


(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)