नवी दिल्ली: मोठी आर्थिक उलाढाल असलेली मलेशियातील कंपनी क्रेडल ग्रुपचे सीईओ नजरीन हसन यांचा आपल्या बेडरूममध्येच मृत्यू झाला. नजरीन हसन यांनी आपले दोन मोबाईल बेडरूममध्ये चार्जिंगला लावले असताना ही घटना घडली. चार्जिंग सुरू असताना दोन मोबाईलपैकी एकाचा स्फोट झाला आणि बेडरूममधील वस्तूंना आग लागली. यात त्यांचा मृत्यू झाला.


बेडरूममधील मोबाईलचा स्फोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, क्रेडल ग्रुपने या घटनेनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले, 'पोस्टमार्टम रिपोर्ट अहवालात म्हटले आहे की, बेडरूममध्ये उशाजवळ चार्जिगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने हसन यांचा मृत्यू झाला.' क्रेडल ग्रुपने पुढे म्हटले आहे की, बेडरूममधील मोबाईलचा स्फोट झाल्याने झालेल्या जखमांमुळे हसन यांचा बळी गेला.


दोन स्मार्टफोनपैकी एकाचा स्फोट


दरम्यान, हसन यांच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की, बेडरूममध्ये असलेल्या दोन स्मार्टफोनपैकी एकाचा स्फोट होऊन त्यांचा मृत्यू झाला. पण, मेलेशियाच्या सेलनगोर अग्निशमन विभाग हसन कुटुंबिय आणि क्रेडल ग्रुपच्या दाव्याशी सहमत नाही. सेलनगोर अग्निशमन विभागाचे निदेशक अजी ओस्मान यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, हसन यांच्या मृत्यूबाबत केली जाणारे वक्तव्ये हे केवळ दावे आहे. इतक्या तत्काळ कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य नाही. 


दरम्यान, स्फोट झालेला मोबाईल नेमके कोणत्या कंपनीचा होता, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.