Sad Incident : लग्न किंवा सणवार म्हंटलं की सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येते, ती म्हणजे जेवण (Food In Wedding). यावेळी विविध व्यंजनं बनवली जातात. खासकरून लग्नकार्य असेल तर जेवण, त्यातील विविध व्यंजनं बनवण्याची प्रचंड लगबग असते. शहरांमध्ये हॉलमध्येच जेवण ( Food In hotel) बनवलं जातं. तेच ग्रामीण भागात मंडप किंवा जिथे लग्नकार्य आहे तिथे लग्नकार्यातील व्यंजनं बनवली जातात. मात्र अशाच वेळी सावधानता बाळगली नाही तर मोठी दुर्घटनाही ( unfortunate accident while wedding) होऊ शकते. असंच काहीसं झालंय एका लग्नकार्यात. एका मेजवानीसाठी खास व्यंजनं बनवताना एक शेफ चक्क चिकन सूपच्या ( Big Vat of Chicken Soup) कढईत पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना एवढी भीषण होती ज्याने सर्वांनाच याचा मोठा धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटेलमध्ये एका खास मेजवानीसाठी जेवण ( feast in hotel)  खास जेवण बनवण्याचं काम सुरु होतं. २५ वर्षीय शेफ ईसाकडे सूप बनवण्याची जबाबदारी देण्यात आलेली. मात्र हेच चविष्ट सूप बनवताना (Tatsty Chicken Soup) या ईसाचा  पाय घसरला आणि हा चक्क गरमागरम सूप बनवण्याच्या भांडयात पडला. ईसाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. सूपच्या कढईत पडल्याने ईसा तब्बल 70% भाजला होता. ईसाची तब्बल पाच दिवस मृयूशी झुंज सुरु होती. मात्र पाच दिवसानंतर ईसाच्या जाण्याची वाईट बातमी समोर आली. अथक प्रयत्नानंतर देखील ईसाला रुग्णालयातील डॉक्टर्स वाचवू शकले नाहीत. 


 हेही वाचा : Health Benifits : या भाजीत आहेत 20 पेक्षा जास्त पोषक तत्त्वं, खाल तर निरोगी राहाल..


कोण होता ईसा :


ही घटना इराकच्या बगदादमध्ये घडली होती, ईसा हा 25 वर्षीय शेफ होता (25 years old isa ismile chef).अनेक वर्षांपासून ईसा शेफ म्हणून काम करत होता. त्याला या खास कामासाठी भरभक्कम पैसे देखील मिळायचे. 


लग्नकार्य किंवा मोठ्या प्रमाणात जेवण बनवताना अशा दुर्दैवी घटना घडतात ज्याने सुरक्षेच्या दृष्टीने आपण किती सजग आहोत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. ईसा इस्मालिल याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर देखील सोशल मीडियावर ( Social Media) मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. सुरक्षेसाठी हॉटेल चालकांनी कशा प्रकारे विशेष काळजी घेतली पाहिजे याबाबत मंथन झालं. 


chef dies after falling in hot chicken soup raises questions on safety