चीनने डोकलाममध्ये सुरू केली रस्त्याची निर्मिती
पुन्हा सुरू झालेली रस्तेबांधणी यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा निर्माण होऊ शकतो.
नवी दिल्ली : डोकलामप्रश्नी चीन आणि भारतादरम्यान सुरू असलेली तूतू-मैमै शमली असे वाटत असताना आता नवा वाद उफाळून आल्याची चिन्ह आहेत. कारण चीनने पुन्हा एकदा रस्त्याचे बांधकाम सुरू करायला घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत. चीनने सैनिक तैनात केले आणि पुन्हा सुरू झालेली रस्तेबांधणी यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा निर्माण होऊ शकतो.
दरम्यान भरतात जाणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी चीनने 'ट्रॅव्हल अॅडव्हायसरी' जाहीर केली आहे. विरोधी पक्षनेतेपद थांबविल्यानंतर चीनने प्रथमच अशी चेतावणी जारी केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, जिथे भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये ७३ दिवस कडक बंदोबस्त होता त्याठीकाणी जवळजवळ ५०० सैनिक चीनने तैनात केले आहेत. चीनने पुन्हा एकदा या क्षेत्रातून सुमारे १० किलोमीटर अंतरावर रस्त्यावर काम सुरू केले आहे.त्यामूळे दोन्ही देशांमधील सीमेवरील तणाव अजून कमी झाला नसल्याचे दिसून येते. चीन हळूहळू डोकलाममध्ये आपल्या सैन्याची संख्या वाढवत आहे, यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते. याबाबतीत भारताला चिंता करणे गरजेचे असल्याचे सुत्रांनी सांगितले.