बीजिंग : जर अमेरिकी यद्धनौकांनी तैवानच्या बंदरांना भेट दिली तर आम्ही तैवानवर आक्रमण करू, असं आकांडतांडव चीनने केलंय.


चीनचं आकांडतांडव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैवान हा चीनचाच भाग असल्याचा दावा करत , अमेरिका आपल्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप चीनने केलाय. अमेरिकी नौदलाने तैवानचं आमत्रण स्वीकारलयं. त्यामुळे लौकरच अमेरिकेच्या युद्धनौका तैवानला भेट देतील. यामुळे चीन प्रचंड संतापला असून त्याने तैवानला आक्रमणाची धमकी दिली आहे. 


तैवानवर दबाव


सोमवारी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानभोवती पेट्रोलींगसुद्धा केली. अमेरिकेने अलिकडेच तैवानबरोबर एक करार केला. ज्यामुळे दोन्ही देशांच्या युद्धनौका एकमेकांच्या तळांवर भेटी देऊ शकतील. 


तैवानचा आत्मविश्वास


चीन मात्र तैवानला स्वत:चाच भूप्रदेश समजत असल्यामुळे अमेरीकेने तैवानबरोबर केलेला करार त्यांना मान्य नाही. चीनने यावर प्रचंड आकांडतांडव केलंय. त्याचबरोबर तैवानने मात्र चीनचा दबाव झुगारून दिलाय. आमचं सैन्य प्रत्युत्तर देण्यास समर्थ असल्याचं सांगत, चीनच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेऊन असल्याचं म्हटलंय.