नवी दिल्ली : संपूर्ण जगात विस्तारवादाच्या रणनीतीमुळे प्रसिद्ध असलेल्या देश चीनने आशिया खंडानंतर आता दुसऱ्या खंडामध्ये देखील आपला विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. चीनने आफ्रिकेमध्ये देखील पाय पसरायला सुरुवात केली आहे. आफ्रिकेतील अनेक महाद्वीपमध्ये चीन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. चीनने आफ्रिकेतील अनेक देशांना कर्ज दिलं आहे. पण आता माहिती अशी येते आहे की, आफ्रिकेतील जांबिया देशाने चीनला कर्ज दिलेल्या वेळात परत न केल्याने चीनने एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या ताब्यात घेतलं आहे.


स्थानिक न्यूज वेबसाईटचा खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेतील स्टँड डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, चीन सध्या आमिष दाखवून आफ्रिकेमध्ये आपले पाय पसरण्याचा प्रयत्न करतो आहे. जांबिया कर्ज न फेडू शकल्याने चीनने त्यांच्या एका विमानतळाचा ताबा घेतला आहे. चीनने हे विमानतळ टेकओव्हर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जांबियन नॅशनल ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशनमध्ये चीनची भागीदारी 60 टक्के आहे. यावरुनच त्यांचा या देशात हस्तक्षेप किती आहे हे लक्षात येतं. याचाच अर्थ असा की आता चीनच्या परवानगी शिवाय येथून कोणतीही माहिती बाहेर नाही येऊ शकतं.


जांबिया सरकारने बातमी फेटाळली 


चीन त्यांचं आंतरराष्ट्रीय विमानतळ टेकओव्हर करत आहे हा दावा जांबिया सरकारने फेटाळून लावला आहे. सरकारचे प्रवक्ते डोरा सिलिया यांनी ट्विट करुन याचं खंडन केलं आहे. सरकार त्यांची काही संपत्ती चीनला विकणार आहे ही माहिची चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'ZNBC आणि केके एयरपोर्टचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. अशातच त्याला कसं विकलं जाऊ शकतं.'