कसं जमलं? चंद्राच्या सर्वाधिक अंधकारमय भागाचा तुकडा घेऊन चीनचं Change 6 पृथ्वीवर परतलं आणि...
China Chang`e 6 : यान पृथ्वीवर परतलं त्या क्षणाची दृश्य भारावणारी... इस्रोपासून नासापर्यंत जगभरातील अंतराळसंशोधन संस्था आणि संशोधकही भारावले.
China Chang'e 6 Mission Moon : भारताच्या चांद्रयान मोहिमेला यश मिळालेलं असतानाच त्यापुढील टप्पे सर करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे (ISRO) प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे नासा आणि इएसआयसुद्धा या अंतराळासंदर्भातील अनेक प्रश्नांची उकल करण्याच्या प्रयत्नांत दिसत आहे. त्यातच आता एक भारावणारं वृत्त समोर आलं आहे. कारण, प्रत्यक्षात चंद्राचाच एक तुकडा घेऊन चीनचं Chang'e 6 हे यान आता पृथ्वीवर परतलं आहे. जे कोणत्याही देशाला जमलं नाही, ते चीननं करून दाखवल्यामुळं अंतराश संशोधन क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा समजला जात आहे.
ऐतिहासिक कामगिरी करत (China) चीनच्या यंत्रमानवी Chang'e 6 मोहिमेला मंगळवारी 25 जून रोजी मोठं यश मिळालं. चंद्राच्या सर्वाधिक रहस्यमयी आणि अंधकारमय भागातून काही नमुने हे यान पृथ्वीवर आणण्यात यशस्वी ठरलं आहे. Chang'e 6 च्या परतीचं कॅप्स्युल चीनच्या मंगोलिया प्रांतातील अंतर्गत क्षेत्रामध्ये लँड झालं. प्राथमिक माहितीनुसार Chang'e 6 मोहिमेत चार मॉड्युल होते. यामधघ्ये लँडर, रिटर्न कॅप्स्युल, ऑर्बिटर आणि एस असेंडरचा समावेश होता. 3 मे रोजी चीनची ही मोहिम सुरु झाली होती. ज्यानंतर साधारण पाच दिवसांनंतर या Chang'e 6 नं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. 1 जून रोजडी लँडर अपोलो क्रेटरवर उतरलं. हा चंद्राचा तो भाग आहे, जो त्याच्या दक्षिण ध्रुवापासून जवळ असून, प्रत्यक्षात हा भाग चंद्राचा अतिशय दूरवरचा भाग समजला जातो. या भागाची व्याप्ती साधारण 1600 मैल असल्याचं चीनकडून सांगण्यात आलं आहे.
चक्क चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणणं कसं जमलं?
स्पेस.कॉमच्या माहितीनुसार चीनच्या Chang'e 6 मधील लँडर स्कूप आणि ड्रीलच्या मदतीनं चंद्रावरील 4.4 पाऊंड म्हणजेच जवळपास 2 किलोग्रॅम इतके नमुने एकत्र करत पृथ्वीवर आणले. 3 जून रोजी हे नमुने असेंडरवर लाँच करण्यात आले आणि त्यानंतर हे मिशन पुन्हा ऑर्बिटरशी जोडलं गेलं. नासाच्या माहितीनुसार हे ऑर्बिटर रिटर्न कॅप्स्युलमध्ये येऊन 21 जूनच्या जवळपास Chang'e 6 चा परतीचा प्रवास सुरु झाला. मंगळवारी झालेल्या पृथ्वीवरील यशस्वी लँडींगनंतर ही मोहीम पूर्ण झाली. ज्यानंतर चंद्राचे नमुने संशोधकांनी सुरक्षितरित्या प्रयोगशाळेत नेत पुढील निरीक्षणास सुरुवात केली.
हेसुद्धा वाचा : 27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विलियम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर
दरम्यान, या संपूर्ण मोहिमेमुळं अंतराळ क्षेत्रामध्ये चीनची तादक आणखी वाढल्याचं वैश्विक शक्तींकडून सांगितलं जात आहेत. इथं अमेरिकेनं चंद्रावर मानवाला पाठवण्यासाठीचे प्रयत्न सुरु करून चंद्रावर आपला तळ ठोकण्याचा मनसुबा व्यक्त केला असतानाच चीननं त्यापुढं जाऊन काही टप्पे ओलांडल्यामुळं आता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये स्पर्धा लागल्याची बाब नाकारता येत नाही.