China Vending Machine : जगाने गेल्या काही वर्षात खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, वैद्यकीय, अॅग्रो क्षेत्र अशा विविध क्षेत्रात नवनवे शोध लावण्यात आले आहेत. ज्यामुळे मनुष्याचं काम खूप सोपं झालं आहे. मनुष्याची घरबसल्या अंगमेहनत न करता कामं होऊ लागली आहेत. यामध्ये मानवरहित व्हेडिंग मशिनचाही समावेश आहे. आजकाल मॉल्स, मोठी दुकानं आणि अगदी ऑफिसमध्येही व्हेडिंग मशीन (Vending Machine) लावलेल्या दिसतात. या व्हेंडिंग मशीनमध्ये विविध खाद्यपदार्थ, चहा. कॉफी, चॉकलेट, वेफर्स सारखे पदार्थ ठेवलेले असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण चीनमध्ये (China)  लावण्यात आलेली एक व्हेंडिंग मशीन सध्या वादाचा विषय ठरली आहे. चीनमधल्या सामन्य जनतेने यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सोशल मीडियावरही यावर टीका केली जाऊ लागली आहे. सोशल मीडियावर या व्हेंडिंग मशीचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. या व्हेडिंग मशीनमध्ये चक्क पाळीव प्राणी (Pet Animals) ठेवण्यात आले आहेत. यात मांजर, कुत्रे आणि इतर पाळीव प्राण्यांचा समावेश आहे. म्हणजे व्हेडिंग मशीनद्वारे पाळीव प्राणी मिळणार आहेत. 


चीनमधल्या बिजिंग शहरात पाळीव प्राण्यांची ही व्हेडिंग मशीन ठेवण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन चीनमध्ये आणि जगभरात नवा वाद सुरु झाला आहे. व्हायरल व्हिडिओत मांजरी आणि कुत्र्यांना लहान-लहान बॉक्समध्ये ठेवण्यात आलेलं दिसतंय. तासनतास हे बॉक्स त्या व्हेडिंग मशीनमध्ये पडून असतात. त्याच अवस्थेत पाळिव प्राण्यांना राहावं लागत असल्याचं म्हणजे त्यांना मुक्त संचार करता येत नसल्याचं या व्हिडिओत दिसतंय.


व्हेंडिंग मशीनची जाहीरात
ऑडिटी सेंट्रल नावाच्या एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या पाळि प्राण्यांची व्हेंडिंग मशीन अशी याची जाहीरात करण्यात आली आहे. काही सोशल मीडिया युजर्सच्या मते चीनच्या अनेक भागात अशा व्हेंडिंग मशीन याआधीही पाहिल्या गेल्या आहेत. काही युजर्सने व्हेडिंगमशीन मधील काही प्राणी मेले असल्याचाही दावा केला आहे. 


सामान्य लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
चीनी सोशल मीडियावर या व्हेंडिंग मशीन विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने म्हटलंय या व्हेडिंग मशीनला कोणी परवानगी दिली? पाळिव प्राण्यांबाबत ही क्रुरता असल्याचं एका युजरने म्हटलंआहे. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी यावर आवाज उठवावा अशी मागणी काही युजर्सने केली आहे. प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचं सांगत लोकांनी संताप व्यक्त केलाय.