मुंबई : चीन (China) ने नियंत्रण रेषेवर स्वतःला मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे लडाखजवळ असलेल्या लढाऊ विमानांकरता नवीन एअरबेस (Airbase) तयार करण्यात आलंय. याच्या तयारीतच चीन लागलं आहे.  भारतीय एजन्सी ड्रॅगनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. पूर्व लडाखवरून भारत आणि चीनवरून वाद सुरू आहे. 


Fighter Aircraft ची संख्या वाढली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज एजन्सी ANI ने सरकारी सुत्रांचा दुजारा देत सांगितलं की, चीन (China) पूर्वी लडाखच्या जवळचे शिंजियांग प्रांत (Xinjiang Province) चे शाकच्या शहरात एअरबेस बनवलं आहे. या एअरबेसला सैन्यांच्या दृष्टीकोनाने तयार करण्यात आलं आहे. 


इथून चीनचे लडाऊ विमान उडणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, चीनचं नवं एअरबेस पहिल्यापेक्षा अधिक विकसित आहे. काशगर आणि होगानहून अधिक आधुनिक असं एअरबेस आहे. आतापर्यंत या दोन एअरबेसच्या माध्यमातून चीनने भाररताच्या सीमेवर कुरघोडी केली आहे. नवीन एअरबेस तयार झाल्यानंतर लढाऊ विमानांची संख्या आणखी वाढणार आहे. 


Uttarakhand Border वर नजर 


पूर्वी भारतीय सीमेपासून चीनच्या जवळच्या एअरबेसपर्यंतचे अंतर सुमारे 400 किमी होते. सूत्रांच्या माहितीनुसार शाक्चे शहरात यापूर्वीच एअरबेस आहे आणि तो फायटर एअरबेस म्हणून विकसित करण्यात येत आहे. या एअरबेसवर काम जोरात सुरू आहे. त्यामुळे लवकरच लढाऊ विमानांचे कामही येथून सुरू होऊ शकेल. त्याचवेळी, भारतीय संस्था बाराहोटीमधील उत्तराखंड सीमेजवळ चीनबरोबरच्या हवाई क्षेत्रावर देखील बारीक नजर ठेवून आहेत. जिथे चिनी लोकांनी मोठ्या प्रमाणात मानव रहित हवाई वाहने आणली आहेत.


भारतही सज्ज आहे


चीनच्या प्रत्येक हालचालीवरही भारत लक्ष ठेवून आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय संघाने लेह आणि इतर अग्रेसर हवाई तळांवर अनेक लढाऊ विमानही तैनात केले आहेत. जे एकाच वेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी लडाखमधील तळांवर स्पर्धा करू शकतात. अंबाला आणि हशिमारा विमानतळांवर राफळे लढाऊ विमानांच्या तैनात आणि कारवाईने चीनविरूद्धच्या भारताच्या तयारीलाही चालना मिळाली आहे.