China HMPV Virus : साधारण पाच वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात एकाच आजाराची दहशत होती. हा आजार, किंबहुना ही माहमारी होती कोरोना व्हायरसची. चीनमधून डोकं वर काढलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गानं पाहता पाहता सारं जग व्यापलं आणि सगळीकडेच Lockdown पर्यंतची परिस्थिती ओढावली. आता कुठे या महामारीच्या संकटातून जग सावरत नाही आणि नागरिकांचं आयुष्य पूर्वपदावर येत नाही तोच आता चीनमध्ये पुन्हा एका महामारीनं डोकं वर काढलं असून, आता हे संकट जगासाठीही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये सध्या रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, इथं नागरिकांनी पुन्हा एकदा सक्तीनं मास्कचा वापर सुरू केला आहे. चीनमध्ये सध्या सुरू असणाऱ्या घडामोडी संशयास्पद असल्याचं म्हणत जागतिक स्तरावरील वृत्तसंस्थांमध्ये हे राष्ट्र पुन्हा एकदा जगाला संकटात टाकू शकतं याविषयीची शंका व्यक्त केली जात आहे. 


कोरोना काळात जी परिस्थिती पाहायला मिळाली होती असंच काहीसं चित्र सध्या चीनमध्ये पुन्हा पाहायला मिळत आहे. सध्या इथं रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा असून, हे सर्वकाही HMPV नावाच्या एका विषाणूजन्य आजारामुळं घडत असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या चीनमध्ये चार विषाणूंचा संसर्ग फोफावला असून, इथं एचएमपीव्ही म्हणजेच माइकोप्लाज्मा निमोनिया अतिशय झपाट्यानं पसरत असल्यानं आरोग्य यंत्रणाही चिंतेत आल्या आहेत. या विषाणूची एकंदर रचना कोरोनाच्या विषाणूप्रमाणंच असून तो हवेमार्फत संक्रमित होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : 2025 मधील सर्वात मोठी बातमी! मोदी सरकार 'काश्मीर'चं नाव बदलणार? शाहांनी सांगितलं नवं नाव


 


चीनमध्ये पुन्हा एकदा रुग्णालयांपासून स्मशानांपर्यंत सतर्कता बाळगली जात असतानाच कोविडप्रमाणंच यावेळीसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. एकिकडे चीनमध्ये परिस्थिती आणखी बिघडत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत असतानाच दुसरीकडे WHO नं याविषयी कोणतीही स्पष्टोक्ती न देणं ही गंभीर बाब ठरत आहे. किंबहुना चीन कोरोनाप्रमाणंच आणखी एक महामारी जगाला देणार का? हाच चिंताजनक प्रश्न आता अनेक स्तरांतून उपस्थित केला जात आहे.