सुषमांनी पाकिस्तानला खडसवलं पण, चीनला मिरच्या झोंबल्या
संयुक्त राष्ट्र संघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानला चांगलंच खडसावलं.
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानला चांगलंच खडसावलं. सुषमा स्वराज यांच्या या भाषणाचं विरोधकांकडूनही कौतुक होत आहे. असं असलं तरी सुषमा स्वराज यांच्या या भाषणानंतर चीनचा जळफळाट झाला आहे.
चीनच्या आघाडीच्या वृत्तपत्रांमधून सुषमा स्वराज यांच्या भाषणावर टीका करण्यात आली आहे. भारतामध्ये झालेल्या आर्थिक विकासामुळे पाकिस्तानला कमी लेखलं जात असल्याचं ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रात मांडण्यात आलंय. तसंच पाकिस्तानमध्ये दहशतवाद आहे. पण दहशतवादाचं समर्थन करणं ही पाकिस्तानची भूमिका आहे का? असा सवाल ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रानं उपस्थित केला आहे. भारतानं मतभेद वाढवू नयेत तसंच पाकिस्तानचा आदर करावा आणि चीनसोबत मैत्री करावी असा फुकटचा सल्लाही ग्लोबल टाईम्सनं दिला आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा स्वराज?
संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. दहशतवादी संघटना, जिहादी आणि दहशतवादी तयार केलेत. तर भारताने वैज्ञानिक, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ घडवले असेही सुषमा स्वराज यांनी म्हटले.